कळंगुट: गोवा देश विदेशातील पर्यटकांसाठी नेहमीच हॉट डेस्टिनेशन राहिले आहे. गोव्यातील बीच, निसर्ग सौंदर्य, येथील मार्केट, नाईफ लाईफ आणि पार्टी क्लब याचे आकर्षण सर्वच पर्यटकांना असते. गोव्यात येणाऱे पर्यटक कळंगुटला भेट दिल्याशिवाय माघारी जात नाहीत. कळंगुटमधील शॅक्स आहेतच पण येथील टीटोज् लेन देखील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
टीटोज् लेनमध्ये अनेक क्लब असून येथे नाईट लाईफसह संगीत पार्ट्या सुरु असतात. या पार्ट्यांचे आकर्षण अनेकांना असते. दरम्यान, येथील एक व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा चांगलेच संतापले आहेत. गोवा पर्यटनाची लाजिरवाणी पातळी, असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
गोवान जंकी नावाच्या एका Instagram Account वरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक पर्यटक टिटोज लेनच्या रस्त्यावर नाचताना दिसत आहेत. त्यासोबत त्याचे मित्र देखील आहेत. शेजारीच असलेल्या क्लबमध्ये जोरात आवाजात संगीत सुरु असून रस्त्यावरील तरुण क्लबमधील तरूणीशी चाळे करताना दिसत आहे. रिलवर तुम्ही पहिल्यांदा गोव्यात येता तेव्हा असे लिहण्यात आले आहे.
या व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलेच पसंत केले आहे पण, हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी या व्हिडिओवरुन संताप व्यक्त केला आहे.
'लाजीरवाण्या पातळीवरील पर्यटन गोव्यात सुरुय. गोव्याची प्रतिमा खराब करणाऱ्या अशा प्रकारच्या वाईट गोष्टी बंद करायला हव्यात', असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी म्हटले आहे. फेरेरा यांनी याच व्हिडिओवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.