'ही माझी शेवटची निवडणूक, कृपया मला खंबीर पाठिंबा द्या'

तृणमूलही बंगाली पार्टी असली तरी गोव्यासाठी चांगल्या योजना याच पक्षाने पुढे आणल्या आहेत
Trinamool Congress
Trinamool CongressDainik gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव : मी वयाची 72 वर्षे पूर्ण केली आहेत. यंदाची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक आहे. कृपया माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा अशी मागणी बणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी आज केली.

सध्या बाणावली मतदारसंघात आपचे व्हेंझी व्हिएगस यांनी प्रचारात बरीच मोठी आघाडी घेतली असून तेच या मतदारसंघात जिंकतील अशी सध्या हवा आहे. या पार्श्वभूमीवर आलेमाव यांनी हे भावनिक आवाहन केले आहे.

Trinamool Congress
लोबोंचा प्रभाव कमी करण्यासाठी जोशुआ डिसोझांच्या मोहिमेत 'हे' आमदार सामील

सध्या चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांच्यावर ते तृणमूल (Trinamool) पक्षात गेल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. तृणमूल ही बंगाली पार्टी असा आरोप केला जात आहे. या आरोपाला उत्तर देताना तृणमूलही बंगाली पार्टी असली तरी गोव्यासाठी (goa) चांगल्या योजना याच पक्षाने पुढे आणल्या आहेत. आणि भविष्यात गोव्यात हाच पक्ष सत्तेवर येणार आहे. मोदी आणि शहा यांना टक्कर देण्याची ताकद फक्त ममता बॅनर्जी यांच्यामध्येच असून भाजपला सत्तेवरून घालवून देण्यासाठी तृणमूल शिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com