Summer Special Train: गोवामार्गे तिरुवनंतपुरम-मदार विशेष रेल्वेसेवेला मुदतवाढ, उन्हाळी सुटीसाठी प्रवाशांना दिलासा

Thiruvananthapuram Madar Junction Special: उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मडगावमार्गे जाणाऱ्या तिरुवनंतपुरम सेंट्रल - मदार जंक्शन - तिरुवनंतपुरम सेंटल या विशेष गाडीची सेवा जून २०२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Thiruvananthapuram Madar Junction Special
Thiruvananthapuram Madar Junction SpecialDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मडगावमार्गे जाणाऱ्या तिरुवनंतपुरम सेंट्रल - मदार जंक्शन - तिरुवनंतपुरम सेंटल या विशेष गाडीची सेवा जून २०२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाडीच्या डब्यांची रचना सुधारलेली आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन समर स्पेशल ही गाडी दर बुधवारी धावते. ही गाडी पूर्वी २५ मार्च २०२६ पर्यंतच चालविण्यात येणार होती. मात्र आता तिची मुदत वाढवून दि. १५ एप्रिल २०२६ पासून ३ जून २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत ठेवण्यात येणार आहे.

Thiruvananthapuram Madar Junction Special
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 34 अंशांवर, घामाच्या धारांनी गोवेकर हैराण

तसेच, गाडी क्रमांक ०६०१४ मदार जंक्शन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल समर स्पेशल ही गाडी दर शनिवारी धावते. ही गाडी यापूर्वी २८ मार्च २०२६ पर्यंत नियोजित होती. आता तिची मुदत वाढवून १८ एप्रिल २०२६ पासून, ६ जून २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.

तिरुवनंतपुरम सेंट्रल मदार जंक्शन - तिरुवनंतपुरम सेंट्रल या समर स्पेशल गाडीच्या डब्यांच्या रचनेत (कोच कंपोझिशन) बदल करण्यात आला असून ही सुधारित रचना एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे.

Thiruvananthapuram Madar Junction Special
Goa Politics: आपल्याकडून विश्वासघात होणार नाही! काँग्रेस प्रवेशावेळी अमित पालेकरांनी नेत्यांना दिली ग्वाही

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०६०१३/०६०१४ साठी एकूण २० डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ३ टियर एसीचे २ डबे, स्लीपर वर्गाचे १६ डबे तसेच एसएलआर / डी (गार्ड व सामानासाठी) २ डबे समाविष्ट आहेत.

ही नवीन सुधारित रचना गाडी क्रमांक ०६०१३ (तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन) साठी १५ एप्रिल २०२६ पासून लागू होईल. तर गाडी क्रमांक ०६०१४ (मदार जंक्शन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल) साठी हीच रचना १८ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com