Third Wave: कोरोनाची पहिली लाट ओसरताच दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेनंतर जनजीवन जरा कुठे सुरळीत होत आहे असे वाटत असतानाच आता 28 नोव्हेंबरपासून गोव्यात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) सुरू झाली आहे. गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) जाहीर झाल्यापासून प्रचारसभांनी जोर धरला आहे. यातच राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दुसरीकडे तोंडावर असलेली निवडणूक. या सगळ्या परिस्थितीत सरकारचे कोरोना रूग्णांकडे दुर्लक्ष होत आहे का? अशी शंका आता वर्तवली जात आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर जास्त असला तरी रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. गोवा सरकारतर्फे (Goa Government) रुग्णांसाठी हॉस्पिटल सज्ज आहेत. पण गोव्यातील बाधित जनता हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापेक्षा गृहविलगीकरणात (Home Quarantine) राहणे पसंत करत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान गृहविलगीकरणात राहिलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेतली जायची. मेडिकल कीटची सोय असल्यामुळे त्यातूनच औषधे, मास्क, ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरचा पुरवठा रुग्णांना घरपोच होत होता. पण या तिसऱ्या लाटेत ही संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून गेली असल्यामुळे घरात राहणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे या घरी असलेल्या रुग्णांची काळजी योग्यपरीने होत आहे की नाही, हाच आता राज्यासमोरील सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
गोव्यातील विधानसभा निवडणुकीमुळे सरकारचेही या रुग्णांकडे म्हणावे तसे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. मुळातच नागरिक कोविड चाचणी (Corona Test) करायला घाबरत आहे, पण जे चाचणी करतात ते हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापेक्षा घरीच विलगीकरणात राहत आहेत. किंवा खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. सरकारने कितीही सांगितले तरी आरोग्य व्यवस्थादेखील म्हणावी तितकी सक्रिय नाही. सरकार किंवा आरोग्य विभाग (Health Department) ह्या रुग्णांची चौकशी करायला अकार्यक्षम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या गृहविलगीकरणात राहिलेल्या रुग्णांना वाली कोण? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.