Theft In Bodgeshwar Temple: बोडगेश्वर मंदिरात पुन्हा मोठी चोरी; फंडपेटी फोडून 12 लाखांची रोकड लंपास

Theft In Bodgeshwar Temple Mapusa: मागील काही दिवसांपासून म्हापसा येथील श्री बोडगेश्वर संस्थान चोरीच्या घटनेमुळे चर्चेत आहे.
Bodgeshwar Temple Goa
Bodgeshwar Temple GoaDainik Gomantak

Theft In Bodgeshwar Temple Mapusa

मागील काही दिवसांपासून म्हापसा येथील श्री बोडगेश्वर संस्थान चोरीच्या घटनेमुळ चर्चेत आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर आज चोरटयांनी पुन्हा एकदा फंडपेटी फोडून तब्बल 12 लाखांची रोकड लंपास केली.

बुरखा घालून आलेल्या चार चोरट्यांनी संस्थानाच्या सिक्युरिटी गार्डला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याला खुर्चीला बांधून त्यांनी मंदिरातून रोकड लंपास केली.

याप्रकरणी आता संस्थान समितीने म्हापसा पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनीही (Police) यासंबंधीच्या तपासाला गती दिली आहे.

दरम्यान, श्रीदेव बोडगेश्वर संस्थान गोव्यासह (Goa) शेजारील राज्ये महाराष्ट्र, कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. या राज्यांमध्ये बोडगेश्वराची ख्याती चांगलीच आहे.

हा देव नवसाला पावतो अशी महती आहे. त्यामुळे लोक मोठ्या भक्तीभावाने बोडगेश्वराच्या दर्शनासाठी जातात. मात्र हे मंदिर आता चोरट्यांच्या वक्रदृष्टीमुळे चर्चेत आहे.

दोन महिन्यांत दुसऱ्यांदा चोरी झाल्याने सुरक्षेचा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. मंदिराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Bodgeshwar Temple Goa
Bodgeshwar Temple: मंत्री विश्वजित राणे यांच्याकडून श्री बोडगेश्‍वरचरणी सोन्याची मशाल अर्पण

दुसरीकडे, दोन महिन्यापूर्वी (28 मार्च रोजी 4.30 वाजता) देवस्थानात चोरट्यांनी बोडगेश्वराच्या पादुकांची पेटी फोडल्याने खळबळ उडाली होती.

या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सागर शिंदे आणि आनंद नाईक या दोघांना अटक केली होती. मात्र आज चार चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 12 लाखांची रोकड पळवली.

Bodgeshwar Temple Goa
Shri Dev Bodgeshwar: म्हापशातील जागृत देवस्थान असलेल्या श्री बोडगेश्वर मंदिरात चोरी! मात्र सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे...

दरम्यान, चोरट्यांचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सीसीटीव्हीतील फुटेज पाहिले असता बुरखा घालून आलेले चार लोक रात्री 2. 07 वाजता देवस्थानात शिरले.

त्यांनंतर त्यांनी पहिल्यांदा मंदिराच्या सिक्युरिटी गार्डला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी त्याला मंदिराच्या मागच्या बाजूला नेऊन खुर्चीला बांधले.

चोरट्यांनी तब्बल 12 लाखांचा ऐवज लंपास केला. पहाटे 3 वाजता एक व्यक्ती दर्शनासाठी मंदिरात आला असता हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर त्याने तात्काळ मंदिराजवळ राहणाऱ्या पुजाऱ्याला या चोरीच्या घटनेबद्दल सांगितले. संस्थानाच्या समितीने लगेच म्हापसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संस्थानाने दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी तब्बल 12 लाखांचा ऐवज लंपास केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com