Kala Academy च्या कामात घोटाळा नाही; मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून आरोपांचे खंडन

कला अकादमीचे नूतनीकरण काम सध्या घोटाळ्याच्या प्रक्रियेतून जात असल्याचा आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप
Pramod Sawant & Govind Gaude
Pramod Sawant & Govind GaudeDanik Gomantak
Published on
Updated on

पणजी येथील कला अकादमी नूतनीकरण काम सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. निविदा प्रक्रिया न राबवता खासगी एजन्सीला दिलेल्या या कामात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत कला अकादमीचे नूतनीकरण काम सध्या घोटाळ्याच्या प्रक्रियेतून जात आहे. असा आरोप केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र या आरोपांचे खंडन करत कला अकादमीच्या कामात घोटाळा झाला नसल्याचे म्हटले आहे.

Pramod Sawant & Govind Gaude
Goa Taxi App: टॅक्सी चालकांचा ‘गोवा टॅक्सी’ ॲपला विरोधच! तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा...

कला अकादमीच्या कामात घोटाळ्यावरून कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्यावर विजय सरदेसाई वारंवार आरोप करत आहेत. तसेच, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आज सरदेसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा कला अकादमीचा विषय उचलून धरला. नूतनीकरणाच्या नावाखाली कला अकादमीच्या कामात घोटाळा झाला असून, हा घोटाळ्या सध्या प्रगतीपथावर आहे. राज्य सरकार कर्जाच्या जाळ्यात अडकले असताना देखील सरकारने 66 कोटी रूपये कला अकादमीच्या नावाखाली उधळले असा आरोप सरदेसाई यांनी यावेळी केला.

Pramod Sawant & Govind Gaude
Savio Rodrigues यांचा भाजपला घरचा आहेर; कला अकादमी निविदा प्रक्रियेची चौकशीची मागणी

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपले मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री गोविंद गावडे यांची पाठराखण करत, सरदेसाई यांचे आरोप फेटाळले आहेत. कला अकादमीच्या कामात कोणताच घोटाळा झाला नाही. अकादमी इफ्फी मूहूर्तावर सूरू होईल असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

गोवा भाजपचे प्रवक्ते सॅवियो रॉड्रिग्ज यांनी देखील यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहले आहे. रॉड्रिग्ज यांनी कला अकादमी निविदा प्रक्रियेची चौकशी करून दोषी असणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. निविदा प्रक्रियेला डावलून नामनिर्देशन प्रक्रिया का निवडली याचे कारण जाणून घ्यायचे आहे. असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com