Rudreshwar Temple: रूद्रेश्वर देवस्थान व्‍यवहारात बिगरभंडारींचा हस्तक्षेप नको

Rudreshwar Temple: हरवळे येथे भंडारी समाजाच्या बैठकीत ठराव
Rudreshwar Temple:
Rudreshwar Temple: Dainik Gomantak
Published on
Updated on

Rudreshwar Temple:

हरवळेतील श्री रूद्रेश्वर देवस्थानच्या घटनेनुसार हे मंदिर व मंदिरातील सर्व व्यवहार यावर केवळ भंडारी समाजाचा अधिकार आहे. इतर समाजांसाठी परंपरेप्रमाणे असलेला मान त्यांना सन्मानाने दिला जाईल.

परंतु देवस्थानाच्या व्यवहारात व कार्यांमध्ये बिगरभंडारी समाजाचा कोणताही हस्तक्षेप यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा एकमुखी ठराव हरवळे येथे झालेल्या डिचोली व सत्तरी तालुका भंडारी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी यशवंत माडकर व काशिनाथ मयेकर, संजीव नाईक, ॲड. अनिश बकाल, अमृत आगरवाडेकर, किशोर नास्नोडकर, रोहन कळंगुटकर, बि. जे. नाईक, सुभाष किनळकर उपस्थित होते.

Rudreshwar Temple:
Goa Tourism: समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्ल्यू फ्लॅग मानांकना’ची अट

महाशिवरात्रीच्या दिवशी श्री रूद्रेश्वर मंदिरात गोंधळ घातलेल्या सर्वांवर देवस्थान समितीतर्फे डिचोली पोलीस स्थानकात फौजदरी गुन्हा दाखल केला जाणार आहे, असाही ठराव या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव ॲड. अनिश बकाल यांनी मांडला व संजीव नाईक (पर्वरी) यांनी त्यास अनुमोदन दिले. या ठरावाला सर्वांनी हात उंचावून समर्थन दिले.

Rudreshwar Temple:
Goa Garbage Issue: कचरा व्यवस्थापन संचालकपदी अंकित यादव

20 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे

राज्यातील भंडारी समाज बांधवांना 20 टक्के आरक्षण मिळावे तसेच गोव्यातील ओबीसींची शिरगणती करावी, असा ठराव उपेंद्र गावकर यांनी मांडला. या ठरावलाही सर्वांनी समर्थन दिले. तसेच दर महिन्याच्या पालखी मिरवणुकीला हरवळेत भंडारी समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने जमून थाटात हा सोहळा साजरा करावा. यासाठी संपूर्ण राज्यभरातून वाहतूक व्यवस्था व महाप्रसादाची व्यवस्था करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com