Goa News : मुरगावमध्ये कोळशाचे फारसे प्रदूषण नाही! पर्यावरणमंत्री सिक्वेरा

Goa News : बंदर परिसरात लवकरच डोम उभारणार
 Alex Sequeira
Alex SequeiraDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News :

पणजी, मुरगाव परिसरात कोळशाचे फारसे प्रदूषण होत नाही. तरीही बंदर परिसरात लवकरच डोमसारखी रचना तयार केली जाईल, ज्यामुळे कोळशाच्या धुळीचे प्रदूषण कमी होईल, असे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

कोळशाच्या प्रदूषणामुळे मुरगाववासी त्रस्त झाले आहेत. हिवाळा आणि उन्हाळी हंगामात धुळीचे प्रदूषण उच्च पातळीवर असते. या पार्श्‍वभूमीवर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पर्यावरणमंत्री सिक्वेरा म्हणाले की, मुरगाव भागात कोळशाच्या धुळीचे प्रदूषण फारसे होत नाही. कोळसा प्रदूषणाशी संबंधित हा मुद्दा उच्च न्यायालयासह अनेक संस्थांनी उचलून धरला आहे.

दरम्यान, हणजूण येथील बेकायदा व्यावसायिकांच्या वास्तूंबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या मुद्द्यावर भाष्य करताना, मंत्री सिक्वेरा यांनी खुलासा केला की,

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी या वास्तूंबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ॲडव्होकेट जनरलना सांगितले आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून काही अंतरिम दिलासा मिळण्याची आशा आहे. लवकरच या विषयावर तोडगा निघेल, असे ते म्हणाले.

 Alex Sequeira
Bicholim News : ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कातरवाडा रस्त्याचे भाग्य उजळले ; कामास प्रारंभ

वर्ष अखेरपर्यंत उपाययोजना करू

केंद्र सरकारने मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी क्षमता वाढवली आहे; परंतु राज्य सरकारच्या वतीने आम्ही बंदरात डोमसारखी रचना तयार होईपर्यंत कोळसा हाताळणीची क्षमता वाढवण्यास परवानगी देणार नाही.

डोमसारख्या संरचनेमुळे कोळशाच्या धुळीचे प्रदूषण कमी होईल आणि आम्ही या वर्षाच्या अखेरीस ही रचना तयार होण्याची अपेक्षा करतो, असे आलेक्स सिक्वेरा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com