सहा धरणांमधील जलपातळी खालावली : जलस्रोत खाते

जूनच्या मध्यापर्यंत पुरेल इतकेच पाणी; पंचवाडीत 10 तर अंजुणेमध्ये 14 टक्के पाणी
सहा धरणांमधील जलपातळी खालावली : जलस्रोत खाते
Dainik Gomantak

गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठा झपाट्याने खालावला असून जूनच्या मध्यापर्यंत पुरेल इतके पाणी धरण साठ्यांमध्ये आहे. जर पाऊस वेळेत सुरू झाला नाही तर राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी जलस्रोत खात्याच्या वतीने मान्सून सुरू होण्यापूर्वी राज्यात छोटे पाटबंधारे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे.

जलस्रोत खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या साळावली धरणामध्ये यंदा ते केवळ 27.9 टक्के शिल्लक आहे. तर अंजुणे धरणामध्ये केवळ 14.2 टक्के पाणी आहे. हीच स्थिती आमठाणे, पंचवाडी, चापोली आणि गावणे धरणांची आहे. याही धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे.

सहा धरणांमधील जलपातळी खालावली : जलस्रोत खाते
Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: फोंडा-साखळीमध्ये 16 रोजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवड

राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यांमध्ये कमी जाणवत असली हे तरी हे पाणी पुढील महिना-दीड महिना पुरेल इतके आहे. त्यामुळे सध्या तरी तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती नाही, असे मुख्य अभियंता प्रमोद बदामी म्हणाले.

सध्याची पातळी मीटरमध्ये / शिल्लक पाणी टक्क्यांमध्ये

आमठाणे ४६.७० मीटर ५९ %

चापोली ३१.८८ मीटर ४७%

गावणे ५६.६८ मीटर ४३%

साळावली ७२.७३ मीटर २७%

अंजुणे ७२.७३ मीटर १४%

पंचवाडी १७.१२ मीटर १०%

सहा धरणांमधील जलपातळी खालावली : जलस्रोत खाते
Panaji Crime Case : सुमित मेगेरीचा मृत्यू मारहाणीमुळेच

... तर मुबलक पाणी

राज्यातील धरणांमधील खालावणारा पाणीसाठा लक्षात घेऊन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि जलस्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठरल्यानुसार, राज्यात छोटे पाटबंधारे प्रकल्प उभारावेत.

शिवाय सध्याच्या जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करावी, असे ठरले. छोटे पाटबंधारे प्रकल्प वेळेत करून पूर्ण केल्यास २०२५ पर्यंत राज्यात मुबलक पाणीसाठा निर्माण होईल, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com