डिचोलीतील लामगाव भागातील 'नळ कोरडे'!

लामगाव भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, गेल्या सहा दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत.
Lamgao
LamgaoDainik Gomantak

डिचोली : नळांना पाणी येत नसल्याने संतप्त बनलेल्या डिचोली पालिका क्षेत्रातील लामगाव (Lamgao) भागातील नागरिकांना तेथीलच पाण्याच्या टाकीवर धडक देत कर्मचाऱ्यांना हुसकावून लावत कामकाज बंद पाडले. लामगाव भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, गेल्या सहा दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत.

Lamgao
सत्तरीत पावाचा दर होणार 5 रुपये

संबंधित खात्याला कळवून देखील पाणी पुरवठा पूर्वपदावर आला नसल्याने नागरिकांना विशेषत: ग्रुहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवक सुदन गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दुपारी पाण्याच्या टाकीवर धडक दिली आहे. पंचवीसहून अधिक नागरिकांनी त्याठिकाणी ठाण मांडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com