Chaturhtiच्या मुहूर्तावर कोरनानाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण!

गणेशोत्सवात निर्बंधच नाही; वैद्यकीय तज्ज्ञांकडून भीती व्यक्त
There are no restrictions on Ganeshotsav in Goa
There are no restrictions on Ganeshotsav in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील (Goa) सर्वात मोठा उत्सव (Ganesh Chaturthi) साजरा होत असताना सरकार पातळीवर कुठलेही निर्बंध (SOP) घालण्यात आलेले नाहीत. त्यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी भीती व्यक्त करताना हे तर कोविडच्या (Covid-19) तिसऱ्या लाटेला दिलेले आमंत्रणच अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मागच्या मंगळवारी सरकारतर्फे एसओपी जारी करण्यात आले. मात्र, एका तासातच ते मागे घेण्यात आले. खासगी सोडा, पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावरही सरकारने कुठलेही निर्बंध घातलेले नाहीत. फक्त लोकांनी काळजी घ्यावी एव्हढेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

There are no restrictions on Ganeshotsav in Goa
Goa Vaccination: राज्यातील 4 लाख 75 हजार लोकांचे लसीकरण पूर्ण

कोविड कृती दलातील एका डॉक्टरने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले, की सरकारचे हे धोरण पूर्णतः चुकीचे असून तज्ज्ञांनी जे आधी निर्बंध सुचविले होते ते लागू करण्याची गरज होती. याचे विपरीत परिणाम सप्टेंबरच्या अखेरीस दिसू शकतात.

मडगावचे प्रसिद्ध डॉक्टर, व्यंकटेश हेगडे यांनी यावर्षी राज्यात जी दुसरी लाट आली, त्याला शिमगोत्सवाच्या दरम्यान राज्यात साजरे केलेले धार्मिक उत्सव आणि लग्न समारंभात जमलेल्या गर्दीतून पसरलेल्या विषाणूमुळे आली होती याची आठवण करून देताना आता चतुर्थी साजरी करताना त्यामुळे सरकारने खबरदारी घेणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

There are no restrictions on Ganeshotsav in Goa
Goa SOP Impact: भटजींचा भाजपवर प्रभाव

अन्य एक डॉक्टर म्हणाले, कदाचित निवडणूक तोंडावर आलेली असल्यामुळे सरकारला लोकांना दुखवायचे नसेल, पण पुजाऱ्यांना घरी जाऊन पूजा करण्याचे जे निर्बंध घातले होते ते काढून इतर निर्बंध कायम ठेवता आले असते.

मुख्यमंत्र्यांना न दाखविताच एसओपी जारी

सरकारने जारी केलेला एसओपी अगदी तासाभरात मागे घेण्याच्या प्रकारावर काँग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी आश्चर्य व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांना न दाखविताच हा एसओपी जारी केला का असा सवाल केला. तसे जर असेल तर ही गंभीर बाब आहे. राज्याचे प्रशासन फक्त नोकरशाही चालवीत आहे असेच म्हणावे लागेल आणि जर हे खरे असेल तर हे सरकार बरखास्त करणेच योग्य अशी प्रतिकिया त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com