Ludhiana Punjab Theft Case
Ludhiana Punjab Theft CaseDainik Gomantak

सगळे गोव्याला फिरायला गेले अन् चोरट्याने डाव साधला, घरातून 3400 डॉलर आणि पिस्तूल चोरी

न्यू राजगुरू नगर येथील एक कुटुंब उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याला गेले होते.
Published on

Ludhiana Punjab Theft Case: न्यू राजगुरू नगर, लुधियाना येथून एक चोरीची घटना समोर आली आहे. एका घरातील सर्वजण फिरण्यासाठी गोव्याला गेले असता, तिकडे त्यांच्या घरात चोरी झाल्याची बातमी हिंदी वृत्तपत्र दैनिक भास्करने दिली आहे.

चोरट्याने घरातून 2 लाख रूपये, 3,400 डॉलर आणि 32 बोअरचे एक पिस्तूल चोरून नेले आहे.

याबातमीत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, न्यू राजगुरू नगर येथील एक कुटुंब उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याला गेले होते. दरम्यान, केअरटेकरचे नातेवाईक घरी आले असता त्यांना सर्व सामान विखुरलेले दिसले. या प्रकरणाची तक्रार सराभा नगर पोलीस ठाण्यात देण्यात आली.

तजिंदर सिंग गिल यांचे हे घर असल्याची या बातमीत म्हटले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक व्यक्ती घरात शिरताना दिसत आहे. चोर सुमारे पाऊण तास घरात राहिला आणि सामान चोरून निघून गेला.

Ludhiana Punjab Theft Case
RGP : संजीवनीकडे पगार देण्यासाठी पैसेच नाहीत..!

घराचे मालक तजिंदर सिंग यांचा मंडी गोविंदगडमध्ये वाहतूक आणि शेती संबधित व्यवसाय आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब परदेशात राहते. सुट्ट्यांमुळे गावी आल्यानंतर ते फिरण्यासाठी गोव्याला गेले होते.

तजिंदर सिंग यांचा कुटुंबातील नोकरदार महिला आणि अन्य एका व्यक्तीसोबत जमिनीचा वाद आहे. जमिनीची कागदपत्रे चोरीच्या उद्देशाने याच व्यक्तीने या संशयित चोराला येथे पाठवले असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com