Margao Municipality: मडगाव पालिकेतील 50 हजारांच्‍या चोरीचा अजूनही लागेना मागमूस!

Margao Municipality: या चोरीचा तपास मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
Margao Municipality
Margao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Municipality: काही महिन्यांपूर्वी मडगाव नगरपालिकेत 50 हजार रुपयांची चोरी झाली होती. अजूनही या चोरीचा तपास लागलेला नाही.

या चोरीचा तपास मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Margao Municipality
Karnataka Bus Accident At Goa: चालकाला लागली डुलकी; कर्नाटकची बस आगशीत उलटली...

50 हजार ही काही लहान रक्कम नाही. अजूनही या चोरीचा तपास लागत नाही याला काय म्‍हणावे? ही चोरी केवळ कर्मचाऱ्यांच्‍या निष्काळजीपणामुळे झाली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

दोन महिन्यांपूर्वी पालिकेतील संबंधित कर्मचारी वॉशरुममध्ये गेलेला असताना टेबलाच्या खुल्या खणात असलेली ही रक्कम पळविण्यात आली होती.

Margao Municipality
Matoli Bazar: म्हापशात माटोळी बाजारासाठी संपूर्ण ‘लेन’

दरम्‍यान, कौन्सिलच्या बैठकीत हा विषय उपस्थित झाला होता व नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले होते की पोलिस तपास सुरू आहे.

ही रक्कम त्या कर्मचाऱ्याकडून वसूल करून घ्यावी असा मुद्दा बैठकीत मांडला होता. याबाबत मुख्याधिकाऱ्याचे मत आहे की नागरीकांची मागणी रास्त आहे. आम्ही या चोरीचा तपास करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Margao platform fight incident
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com