Goa Crime: बाजारात शीतपेयाचे खोके परस्पर विकले, कमावले 50 लाख

कुंडईतील कोका कोला गोदामातील धक्कादायक प्रकार, सातही संशयित बेपत्ता
Theft Case At kundaim Coca Cola Wearhouse
Theft Case At kundaim Coca Cola WearhouseDainik Gomantak
Published on
Updated on

Theft Case At kundaim Coca Cola Soft Drink Company Warehouse: शीतपेय हे तहान भागवण्याचे साधन म्हणून वापरले जाते. याच शीतपेयाच्या साहाय्याने आर्थिक लाभाचा हव्यास पूर्ण करण्याची किमया सातजणांनी साधल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गोदामातून बाजारात नेलेले शीतपेयांचे खोके परस्पर विकून ५० लाख रुपयांचा अपहार त्यांनी केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. कुंडई येथे हा शीतपेय चोरीचा प्रकार घडला असून या प्रकरणातील सातही जण मात्र बेपत्ता झाले आहेत.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोका कोला कंपनीच्या बाटल्यांचे खोके परस्पर विकून पन्नास लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कुंडई औद्योगिक वसाहतीतील गोदामात हा प्रकार घडला आहे. सातही संशयित गुन्हेगार सध्या बेपत्ता असून पोलिस त्यांना शोधत आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर हे सातहीजण अटक चुकवण्यासाठी बेपत्ता झाले आहेत. हा अफरातफरीचा प्रकार गेल्या पाच सप्टेंबरपासून सुरू आहे.

Theft Case At kundaim Coca Cola Wearhouse
Goa Mining: साठवलेल्या खनिजाचा ई-लिलाव बेकायदेशीर; गोवा फाउंडेशनचा आक्षेप

रामा एंटरप्रायझेसच्या अन्य कर्मचाऱ्यांना याबाबत संशय येताच त्यांनी तपासणी केली असता शिल्लक राहिलेले खोके गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर म्हार्दोळ पोलिस स्थानकात या सातही जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

तपासणीसकाकडून खोटी नोंद!

कुंडई येथील कोका कोलाच्या गोदामातून कोका कोला बाटल्यांच्या खोक्यांचे वितरण मार्केटमध्ये केले जाते. पिकअपमधून हे खोके गोदामातून बाहेर काढताना त्यांची नोंद केली जाते आणि परत आल्यावर शिल्लक खोक्यांची नोंद केली जाते.

राज्यातील विविध आस्थापने व दुकानांत हे खोके दिले जातात. मात्र, गोदामातून हे खोके मार्केटमध्ये नेल्यानंतर शिल्लक राहिलेले खोके परस्पर विकण्यात आले आणि हे खोके गोदामात असल्याची खोटी नोंद करण्यात आली.

तपासणीस (चेकर) म्हणून काम करणाऱ्या नितेश जाधव याने हे खोके गोदामात असल्याचे दाखवले. मात्र, इतर सहाहीजणांच्या सहकार्याने ते परस्पर विकले होते.

सेल्समनसह सुरक्षा रक्षकही अफरातफरीत सामील

कुंडई येथील रामा एंटरप्रायझेसच्या कोका कोला कंपनीच्या गोदामातून ही अफरातफर करण्यात आली असून याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी सैफूल अब्दुस इस्लाम सत्तार, रामचंद्र संभाजी निकम (सेल्समन), अभिजित रवींद्र सावंत (सेल्समन), अलामीन अल्लाद्दीन शेख (सेल्समन), संदेश नारायण जोशी (सेल्समन), धनंजय पाल (सुरक्षा रक्षक) व नीतेश जाधव (चेकर) अशा संशयित सातजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Theft Case At kundaim Coca Cola Wearhouse
पैसे कमावण्यासाठी 'प्लान बी' तयार हवा; एका रिलवर 1 million views असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स 'मिथील'ने दिल्या टिप्स

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com