मडगाव पालिकेतील कामकाज ‘ऑफलाईन’ पद्धतीने, नागरिक त्रस्त

लोकांची गैरसोय; पालिका प्रशासनाकडून ऑनलाईनचा वापर होईना
Margao Municipality
Margao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : विविध प्रकारचे दाखले, परवाने व इतर कागदपत्रे लोकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत नसल्याने मडगावातील लोकांची गैरसोय सुरू आहे. पालिका प्रशासनाकडून ऑनलाईन पद्धतीचा वापर होत नसल्याने कामकाज अजूनही ‘ऑफलाईन’ पद्धतीनेच सुरू आहे.

या प्रकारामुळे नगरपालिका (Municipality) कारभारातही पारदर्शकता येत नसल्याचा ठपका जाणकार ठेवत आहेत. पालिका प्रशासन संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी यापूर्वीच राज्यभरातील नगरपालिका मंडळांना परिपत्रक काढून विनाविलंब ही ‘एमएएस’ म्हणजेच पालिका प्रशासन सॉफ्टवेअर व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची सूचना केलेली आहे. तरीही ती अंमलात न आल्याने लोकांना ऑनलाईनद्वारे दाखले किंवा इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत.

Margao Municipality
औद्योगिक कचऱ्याप्रकरणी वेर्णा नागरिक त्रस्त; रास्ता रोकोचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव पालिकेने जुन्या व्यवस्थेवरून आतापर्यंत ऑनलाईनवर एकच बांधकाम परवाना लागू केलेला आहे. ‘एमएएस’ ही माहिती व संचार तंत्रज्ञान सोल्युशन असून ती पालिका संचालकांनी विकसित केलेली आहे. लोकांना त्वरित वेळीच सर्व माहिती व सेवा मिळावी तसेच पालिकेतील एकंदर प्रक्रियांना गती मिळावी हा त्या मागील हेतू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव (Margao) पालिकेने केबल व अन्य नेटवर्किंग मिळत नसल्याने ही नवी व्यवस्था जागेवर घातलेली नसल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येते. ही व्यवस्था पुढे नेण्यासाठी आठ कॉम्प्युटर (संगणक) मडगाव पालिकेला मिळालेले आहेत. पण, ते पडून आहेत.

Margao Municipality
हायकोर्टाची वास्को रेल्वे ट्रॅकिंगला नोटीस

विलंब होण्याचे कारण शोधू

मुख्याधिकारी आग्नेलो फर्नाडिस यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विलंब होण्यामागचे कारण शोधून काढून ती त्वरित कार्यरत करण्याचे आश्र्वासन दिले. नगराध्यक्ष लिंडन परैरा यांनीही या व्यवस्थेस विलंब होण्यामागील तपशील मुख्याधिकाऱ्यांकडून मागवून घेऊ असे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com