स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी 'पदयात्रा' काढावी; काँग्रेसचा सल्ला

मंत्री हरदीपसिंग पुरी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी गोव्यात
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामातील घोटाळे उघड केल्यामुळे केंद्रीय शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी गोव्यात आले आहेत. मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केवळ वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून बैठका न घेता निकृष्ट कामाची माहिती घेण्यासाठी पणजीत 'पदयात्रा' काढावी असा सल्ला गोवा काँग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी भाजप नेत्यांना दिला.

पत्रकार परिषदेस गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके, एल्विस गोम्स, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, पणजी महिला गट अध्यक्ष लविनिया डिकॉस्ता उपस्थित होते.

Goa Congress
Goa Accident News : मापा-पंचवाडी येथे कारची झाडाला धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

पणजीकर म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, इतर मंत्री, अधिकारी यांच्यासमवेत त्यांनी ‘पदयात्रा’ काढली तर, ही कामे करताना झालेला भ्रष्टाचार आणि दर्जाहीन कामांची त्यांना कल्पना येईल.

पणजी स्मार्ट सिटी प्रकल्प हे मिशन टोटल कमिशन बनले आहे हे काँग्रेस पक्षाने उघड केले आहे. या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला आहे आणि यापुढेही तो उघड करू असे पणजीकर म्हणाले.

एल्विस गोम्स म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या कामांचे कोणतेही नियोजन नाही त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर याचा फटका नागरिकांना बसणार आहे. करदात्यांच्या पैशाचा वापर विकासाच्या कामासाठी केला पाहिजे. पण इथे असे काहीही दिसत नाही.

कामे करताना कंत्राटदारांना काय करायचे आहे, याचे भान राहत नाही. केंद्रीय मंत्र्यांनी घरोघरी जाऊन त्यांना सीवरेजच्या कामामुळे कसे त्रास होत आहे हे विचारावे,” असे गोम्स म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com