Goa University: ‘टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी’ अभाविपची ‘बी टीम’

Goa University: एनएसयूआय : कँटीन विषयाचे श्रेय घेऊ नये
Goa University
Goa University Dainik Gomantak

Goa University: गोवा विद्यापीठाच्या वसतिगृहातील कँटीन समस्येचा मुद्दा भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूआय) गोवा विभागाने उपस्थित केल्यानेच त्याची निविदा काढण्यात आली आहे त्याचे श्रेय ‘टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी’ने घेऊ नये.

त्यांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये. त्यातील काही विद्यार्थी हे अभाविपसोबत आहेत ती त्यांची ‘बी टीम’ आहे, असा आरोप एनएसएयूआय गोवा विद्यापीठ प्रमुख वृषभ फळदेसाई यांनी केला.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत फळदेसाई म्हणाले, की विद्यापीठाच्‍या वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी कँटीनमध्ये मिळणाऱ्या हलक्या दर्जाच्या आहाराबाबतची समस्या एनएसयूआयकडे मांडली होती.

या समस्येचा पाठपुरावा एनएसयूआयने करताना २४ जानेवारी २०२४ रोजी विद्यापीठ निबंधकांना निवेदन दिले. मात्र, त्याची दखल न घेतल्याने उच्च शिक्षण खात्याला त्याची प्रत देण्यात आली.

Goa University
Goa Mining Case: पर्यावरणीय आघात मूल्यांकन अहवाल खोटा

त्यानंतर शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांना भेटून निवेदन देण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी गोवा विद्यापीठाने कँटीनसाठी निविदा काढली आहे.

या कँटीनच्या समस्येचा विषय गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये हाती घेण्यात आल्याचा दावा विद्यापीठाच्या ‘टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी’च्या विद्यार्थी मंडळाने केला आहे तो खोटारडा आहे. त्यामुळे ‘टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी’च्या विद्यार्थी मंडळाच्या वक्तव्याचा एनएसयूआयतर्फे निषेध करण्यात येत आहे.

Goa University
Goa Politics: गिरीश चोडणकर यांचे अखेर दक्षिण गोव्‍यातून माघारीचे संकेत

‘विद्यार्थ्यांनी भूलथापांना बळी पडू नये’

यापूर्वीही एनएसयूआयने गोवा विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या हाती घेऊन धसास लावण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी’ विद्यार्थी मंडळाच्या भूलथापांना बळी पडू नये.

हे मंडळ फक्त इव्हेंट्स करत आले असून विद्यार्थ्यांच्या समस्या ते सोडवण्यात अपयशी ठरले आहे. त्यांना विद्यापीठ निवडणुकीवेळी घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन फळदेसाई यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com