'Gomantak Scholar Quiz 2023': गोमन्तक स्कॉलर प्रश्‍नमंजूषा’ 1 जुलैपासून

शालेय विद्यार्थ्यांना संधी: ‘टायटन स्मार्ट वॉच’सह हजारो रुपयांची बक्षिसे
'Gomantak Scholar Quiz 2023'
'Gomantak Scholar Quiz 2023'Dainik Gomantak
Published on
Updated on

'Gomantak Scholar Quiz 2023' दै. ‘गोमन्तक’तर्फे राज्यातील इयत्ता तिसरी ते नववीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘गोमन्तक स्कॉलर प्रश्‍नमंजूषा 2023’ ही योजना सुरू करण्यात येत आहे.

या योजनेचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करणे व त्यांना शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवून देणे हा असून त्यांना बक्षिसे जिंकण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ही स्पर्धा १ जुलैपासून सुरू होणार असून स्मार्ट वॉच, गिअर सायकल, क्रिकेट कीट, स्कूल बॅग, कंपास बॉक्स व उत्तेजनार्थ टिफीन बॉक्स अशा लाखो रुपयांहून जास्त किमतीच्या हजारोंपेक्षा जास्त बक्षिसांचा समावेश आहे.

'Gomantak Scholar Quiz 2023'
Migration of Goans abroad: तब्बल 'एवढ्या' गोमंतकीयांचा मायभूमीला रामराम; गेल्या आठ वर्षांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

यापूर्वीच्या ‘गोमन्तक सुपर फॅमिली 2022’, ‘गोमन्तक स्वास्थ्यम 2023’ या योजनांना, वाचकांकडून व शालेय विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘गोमन्तक स्कॉलर प्रश्नमंजूषा २०२३’ ही योजना दै. ‘गोमन्तक’तर्फे सुरू होत आहे.

याद्वारे त्यांना बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या योजनेला १ जुलै रोजी सुरवात होऊन ती एकूण १०० दिवसांची असेल.

माहितीसाठी भारत पोवार (तिसवाडी, मुरगाव) ९८८१०९९२४७, संजय पाटील (फोंडा, सत्तरी व साखळी शहर) ९९२२९०३०२०, मारुती वाघमारे (सासष्टी, केपे, सांगे, काणकोण) ८४२१३६९३३६ व राजेश दापले (बार्देश, पेडणे व डिचोली शहर) ९८५०९०६०८६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

'Gomantak Scholar Quiz 2023'
Goa Session Court : तारक आरोलकर यांना गोवा खंडपीठाचा दिलासा ; नगरसेवक अपात्रतेचा..

उत्तराचे कुपन कापा, चिकटवा व बक्षिसे जिंका

स्पर्धेतील सहभागासाठी नेहमीप्रमाणे ‘गोमन्तक’च्या अंकातील ‘सदर वाचा, प्रश्नांच्या उत्तराचे कुपन कापून चिकटवा व बक्षिसे जिंका’ ही कार्यपद्धती राहील. यासाठी अंकात गोमन्तक स्कॉलर विषयावर आधारित याच नावाचे एक सदर प्रसिद्ध केले जाईल.

शालेय स्पर्धा परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी, शब्दकोडे, विविध कौशल्ये, मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, स्पोकन इंग्लिश या विषयांवर आधारीत हे खास सदर असणार आहे. एकूण १०० पैकी ८० बरोबर उत्तरांची कुपन्स बक्षिसासाठी ग्राह्य धरली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com