Revolutionary Goans: आज गोवेकरांचा आवाज असणारा एकमेव पक्ष म्हणजे रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) आहे आणि तीच आमची ताकद आहे. आम्ही शिवसेनेसोबत जाणार ही अफवा असून आरजीची आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव आहे.
आम्ही जर भाजपची ‘बी’ टीम असतो, तर त्या पक्षासोबत गेलो असतो. आम्ही मंत्रिपद मिळविले असते, असे ‘आरजी’चे नेते मनोज परब यांनी सांगितले.
आरजी हाच भाजपचा गोव्यातील एकमेव विरोधक आहे. आमच्या आमदाराला विधासभेत बोलायला दिले जात नाही. जर आम्ही भाजपची ‘बी’ टीम असतो तर एवढा खटाटोप कशासाठी केला असता?
आरजी पक्ष सुरूवातीपासून स्वतंत्र आहे आणि पुढेही स्वतंत्र विचारधारेनेच पुढे जाईल. तो कुठल्याच पक्षाबरोबर युती करणार नाही. आम्ही यापूर्वीही कधीच कुठल्या पक्षासोबत युती केली नव्हती आणि यापुढेही करणार नाही, असे परब म्हणाले.
अडसूळ यांना कधीच भेटलेलो नाही
शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ हे आपल्याला भेटल्याचे आणि आपण वारंवार महाराष्ट्राच्या मुख्यंमत्र्यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयात जात असल्याचे बोलले जात आहे. आम्ही केवळ एकदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो.
कधीच आजतागायत अडसूळ यांना भेटलेलो नाही. जर अडसूळ आणि माझी एकदा तरी भेट झाली असेल तर त्यांनी फोटो दाखवावेत. अडसूळांसारख्या चिरीमिरी नेत्यांना आपण भेटत नसतो. त्यामुळे असले घाणेरडे राजकारण सोडून द्या, असा सल्ला परब यांनी दिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.