कोलवा सर्कलकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर!

उपाययोजना कुचकामी : योग्य तोडगा काढण्याची प्रवाशांची आग्रही मागणी
Kolwa Circle News
Kolwa Circle NewsDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगावच्या जुन्या बाजारातील कोलवा सर्कलकडे वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. यावर उपाय म्हणून फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी वाहतूक सिग्नल्स बसवले होते. नंतर चार रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वाहतूक बेटाचा आकार कमी केला होता. तरीही त्यात सुधारणा झालेली नाही, त्यामुळे नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

(The problem of traffic jam at Kolwa Circle is serious)

Kolwa Circle News
जमिनी हडप करण्याची 92 प्रकरणे उघडकीस

नुकतीच आमदार सरदेसाई, पोलिस अधिकारी व वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे या भागाची पाहणी केली. त्यानंतर मडगावला जाणाऱ्या बाजूला जो अडीच-तीन मीटरचा पदपथ आहे तो कापून छोटा करावा, असे ठरले होते. मात्र अद्याप काही हालचाल होताना दिसत नाही. यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बसेस थांबतात भलत्याच ठिकाणी

कदंब बसस्थानकावरून सुटलेल्या बसेसचा पुढचा थांबा एकदम होली स्पिरीट हायस्कूलजवळ आहे. तरीही बसेस कोलवा जंक्शनकडे व नंतर पुढे वळसा घेऊन दक्षिण गोवा शिक्षण खात्याच्या (आऊल) कचेरीसमोर थांबतात. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत असते.

Kolwa Circle News
राज्यात कोरोना संक्रमण दर 14.30 टक्क्यांवर, नवे 130 बाधित रुग्ण

कोंडीची मुख्य कारणे

फातोर्ड्याहून किंवा कदंब बसस्थानकाकडून ज्या बसेस मडगाव शहर मार्गाने जातात त्या मडगाव बाजूच्या रस्त्यावर प्रवाशांना घेण्यासाठी थांबतात.

या बसेस धिम्या गतीने जातात. फातोर्ड्याच्या बाजूला जेव्हा लाल सिग्नल सुरू होते तेव्हा सरळ कोलवा किंवा वळसा घालून पणजी वा वास्कोच्या दिशेला जाणारी वाहने एकाच रांगेने न राहता दोन तीन रांगा होतात. त्यामुळे फातोर्ड्याहून सरळ मडगाव शहरात जाणाऱ्या वाहनांना जाता येत नाही. फोंड्याहून आलेल्या बसेस ज्या कदंब बसस्थानकाकडे जाणाऱ्या असतात त्या प्रवाशांना उतरवण्यासाठी न्यायालय इमारतीच्या समोर थांबा घेतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com