Goa Road Accident: चिंताजनक! अडीच महिन्‍यांत अपघाती बळींची पन्नाशी!

Goa Road Accident: 1 जानेवारी ते 19 मार्चपर्यंत 53जणांचा मृत्यू
Goa Road Accident
Goa Road AccidentDainik Gomantak

Goa Road Accident:

सुशांत कुंकळयेकर

चालू वर्षाच्या २० जानेवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान २२ रस्‍ता बळींची नोंद झाल्‍यानंतर मार्च महिन्‍यात हे प्रमाण काही प्रमाणात खाली उतरले होते.

मात्र, मागच्‍या चार दिवसांत गोव्‍यात पुन्‍हा एकदा रस्‍त्‍यांवर वाहन अपघातात मृत्‍यू होणाऱ्यांची संख्‍या वाढत असून १५ ते १९ मार्च या पाच दिवसांतच पाच बळींची नोंद झाली आहे.

१ जानेवारी ते आजपर्यंतची रस्‍त्‍यांवरील बळींची संख्‍या पाहता एकूण ७९ दिवसांत ५३ रस्‍ता बळींची नोंद झाली असून तीन अपघातांत दुहेरी बळी गेले आहेत.

लहानशा गोव्‍यात दरमहा सरासरी २२ रस्‍ता बळींची नोंद होते.

२०२३ साली हे प्रमाण २४ वर पोहोचले हाेते. त्‍या मानाने यंदाची संख्‍या काही प्रमाणात थोडी कमी आहे. २०२२ मध्‍ये गोव्‍यात २७१ जणांना रस्‍ता अपघातात मृत्‍यू झाला होता.

२०२३ साली हा आकडा २९० वर पोहोचला आणि आता १ जानेवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत एकूण ४९ जीवघेण्‍या अपघातांची नोंद झाली असून त्‍यात ५३ जणांचे बळी गेले आहेत. मागच्‍या वर्षी याच कालावधीत बळींची संख्‍या ७८ वर पोहोचली होती.

मागच्‍या रविवारी बेंदुर्डे-केपे येथे एक पीकअप दरीत कोसळल्‍याने दोघांना मृत्‍यू आला होता. त्‍यामुळे गोव्‍यात होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या ५३ बळींपैकी सर्वांधिक बळी दुचाकीस्‍वारांचे झाले असून त्‍यांची संख्‍या तब्‍बल ४१ एवढी प्रचंड आहे. त्‍यात ३६ दुचाकी चालविणारे असून मागे बसलेल्‍या पाचजणांना मृत्‍यू आला होता.

त्‍या पाठोपाठ गेल्‍या अडीच महिन्‍यात गोव्‍यात ४ पादचारी, ३ अन्‍य वाहनचालक, ३ प्रवासी, एक सायकलस्‍वार, तर एका दिव्‍यांग तीनचाकीस्‍वाराचा समावेश आहे.

हृदयद्रावक पाच अपघात

१७ मार्च रोजी बेेंदुर्डे येेथे पिकअप उलटल्‍याने कोल्‍हापूरच्‍या दोघांना मृत्‍यू आला होता, तर अन्‍य दहाजण जखमी झाले होते. या प्रकरणात कुंकळ्‍ळी पोलिसांनी पिकअप चालकावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद केला आहे.

११ मार्च राेजी टी पुजीथा (२५) ही आंध्रप्रदेशमधील पर्यटक महिला रेंट अ बाईकने जात असताना दुभाजकाला दुचाकीची धडक बसल्‍याने मागे सहप्रवासी म्‍हणून बसलेली ही पर्यटक महिला उसळून कारखाली आल्‍याने चिरडली गेली होती.

२२ फेब्रुवारी रोजी पणजी-मांडवी पुलावर कारची धडक बसल्‍याने जावेद सडेकर (३८) हा युवक गाडीवरून उसळून नदीत पडून त्‍याला मृत्‍यू आला होता. या प्रकरणीही पर्यटक कारचालकावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

१७ फेब्रुवारीला हरमल येथे तेलंगणाहून आलेल्‍या एका पर्यटकाने आपल्‍या गाडीचे दार अकस्‍मात उघडल्‍याने त्‍याची ठोकर बसून साईल नाईक (१९) व दीप नाईक (२१) या दोघा भावांचा मृत्‍यू झाला होता.

१६ फेब्रुवारीला मडगावहून कुडचडेला जाताना चांदर येथे एका ट्रकची धडक बसल्‍याने तन्‍वेश नाईक (२१) व श्रीकर नाईक (१९) या दोन अत्‍यंत जीवलग मित्रांचा बळी गेला होता. या दोन्‍ही घटनांमुळे संपूर्ण गोवा हळहळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com