Goa Corona Updates | Goa Covid 19 | covid-19 bf.7 variant | omicron bf 7 variant
Goa Corona Updates | Goa Covid 19 | covid-19 bf.7 variant | omicron bf 7 variantDainik Gomantak

Goa Corona Update: गोव्यात कोरोनाबाधित सक्रीय रूग्णसंख्या पोहचली 17 वर

गोव्यात गेल्या चोवीस तासात 2 नव्या रूग्णांची नोंद
Published on

Goa Corona Update: चीनसह संपुर्ण जगभरात कोरोना संसर्गाने पुन्हा उचल खाल्ली आहे. त्यामुळे सर्वच देशांमुख्ये कोरोना संसर्गावर प्रतिबंध आणण्याच्या हेतूने खबरदारी घेतली जात आहे. भारतातही केंद्र सरकारने तशा सूचना राज्यांना दिल्या आहेत, काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठकही घेतली. दरम्यान, गोव्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे दोन नवे रूग्ण आढळून आले आहेत.

Goa Corona Updates | Goa Covid 19 | covid-19 bf.7 variant | omicron bf 7 variant
Sunburn Festival: सनबर्न फेस्टिव्हलवर कडक लक्ष ठेवा; ड्रग्जमुळे एक जरी मृत्यू झाला तरी राज्य सरकार जबाबदार...

गोव्यात गेल्या 24 तासात 378 चाचण्या झाल्या आहेत. तर कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गोव्यातील सक्रीय कोरोना रूग्णसंख्या म्हणजेच उपचार सुरू असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 17 झाली आहे. दरम्यान, गोव्याचा कोरोनामुक्ती दर 98.44 टक्के इतका आहे. सध्या गोव्यात दोघेजण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

गोव्यात आत्तापर्यंत 21 लाख 22 हजार 439 एकुण चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी एकुण 2 हजार 59 हजार 065 रूग्ण आढळून आले होते, त्यापैकी 2 लाख 55 हजार 035 कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4013 कोरोनारूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Goa Corona Updates | Goa Covid 19 | covid-19 bf.7 variant | omicron bf 7 variant
Goa Corona: ऑक्सिजन प्लँट सज्ज ठेवा... केंद्राची गोवा सरकारला सूचना

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही बैठक घेत सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गोवा सरकारला ऑक्सिजन प्लांट सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. चीनमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार ठरलेल्या ओमिक्रॉनच्या सब व्हेरियंट BF.7 चा भारतातही शिरकाव झाला आहे, त्या पार्श्वभुमीवर भारतात विविध पातळ्यांवर काळजी घेतली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com