Chapora River: शापोरा नदीत रेतीचा मुबलक साठा; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने सावंत सरकारला दिला रिपोर्ट

Chapora River: शापोरा नदीच्या पात्रात रेतीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याबाबत राज्य सरकारला राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून अहवाल प्राप्त झाला आहे.
Chapora River
Chapora RiverDainik Gomantak

Chapora River: शापोरा नदीच्या पात्रात रेतीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याबाबत राज्य सरकारला राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून अहवाल प्राप्त झाला आहे.

त्यामुळे आता रेती काढण्यासाठी परवाने देताना शापोरा नदीतील जलसंपदेला हानी पोहोचणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे. या नदीच्या पात्रात विविध प्रकारचे मासे, जलचर आणि सागरी पक्ष्‍यांचा वावर असल्याने रेती काढण्यावर कोणते निर्बंध घालता येतील याचा विचार सरकारी पातळीवर सुरू झाला आहे.

राज्यात रेती तीन प्रकारांत उपलब्ध आहे. सामान्य रेती, सिलिका रेती आणि किनाऱ्यावरील रेती. साधारणत: पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या आणि वाहणाऱ्या नदीद्वारे सामान्य रेती आणली जाते. ही रेती पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी परवानगी देण्याचा विषय सरकारच्या विचाराधीन आहे. उच्च न्यायालयात रेनबो वॉरियर्सने दाखल केलेल्या खटल्यात _+

Chapora River
IMD Goa Weather Update : यंदा गोव्यावर मेघराजाची कृपा! धो धो बरसणार पाऊस; सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता

न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अधीन राहून यातून मार्ग काढण्यासाठी निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच सरकारने प्रयत्न शापोरा नदीत रेतीचा पुरेसा साठा चालू केले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केंद्र सरकारकडून संबंधित नियमांत दुरुस्ती केली जाण्याची प्रतीक्षा आहे. निवडणूक आचारसंहिता मागे घेतली गेल्यानंतर या विषयाला गती देण्याचे ठरवण्यात आले आहे.

सध्याच्या नियमानुसार नदी पात्रात तीन मीटर खोलवर रेती काढता येते. देशभरात नद्यांच्या सुक्या पात्रातून रेती काढण्यात येते. तर, गोव्‍यात नदीच्या पात्रात पाणी असतानाच रेती काढण्यात येते. सध्याची रेती ही तीन मीटर खोलवर असल्याने संबंधित नियमांत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तशी मागणी सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.

पोर्तुगीज राजवटीपूर्वी गोव्यात रेती काढणे हा पारंपरिक व्यवसाय आहे यावर सरकारने भर दिला आहे. त्याविषयी पत्रे दिल्लीला पाठवली आहेत. राज्यातील अनेक समुदाय रेती काढण्याच्या व्यवसायावर अवलंबून आहेत, हा मुद्दाही सरकारने केंद्र सरकारकडे मांडला आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील डोंगर परिसरात शापोरा नदीचा उगम होतो. तिथे तिला तिळारी नदी म्हणून ओळखले जाते. गोवा राज्यात नदीचे अंतर ३२ किलोमीटर तर शापोरा नदीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ २५५ चौरस किलोमीटर आहे. सरासरी प्रवाह ५८८.४ (दशलक्ष घनमीटर) आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com