Biodiversity In Sattari: भूतलावरील खरी जैवसंपदा सत्तरीत!

संवर्धनाची गरज : आगीच्या घटनांनंतर जबाबदारी वाढली; हवा-मृदा-जलप्रदूषण रोखणे गरजेचे
Biodiversity
BiodiversityDainik Gomantak
Published on
Updated on

Biodiversity In Sattari सत्तरी तालुक्यात म्हादई नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जैवसंपदेचा अधिवास आहे. त्यामुळे या तालुक्याला विशेष असे महत्व आहे. म्हादईच्या वनसंपदेत अनेक वनस्पती, पशू-पक्षी दृष्टीस पडतात.

म्‍हणूनच केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोनचा मसुदा जारी केला होता. सत्तरीच्या पश्चिम घाट परिसरात तर जैवविविधतेचा खजानाच आहे. त्‍यामुळे या परिसराला महत्त्‍व प्राप्‍त झाले आहे.

विविध प्रजाती, पशू-पक्षी, उभयचर प्राणी, पर्यावरण प्रणाली, वनस्पती, जीवजंतू यांनी हा परिसर भरलेला आहे. पश्चिम घाटात अभूतपूर्व प्राकृतिक वास आहे. सपाट शिखर, पर्वती पठार, पर्यावरण प्रणालींनी भरलेला हा प्रदेश.

Biodiversity
Goa Crime: कुर्टी - खांडेपार बगलरस्त्यावर भरतेय तळीरामांची जत्रा !

म्हणूनच हा जैवभाग संवर्धित केला पाहिजे. जैवसंपदेमुळे अनेक फायदे होतात. सत्तरीत अमाप नैसर्गिक संपत्ती तसेच अभयारण्य क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने इको सेन्सिटिव्ह झोनमुळे त्याचे संरक्षण होण्याबरोबरच वन्य संपत्ती, प्राणी, पक्षी, औषधी वनस्‍पतींचे संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येकाची आहे.

वनौषधींचा अभ्यास करणारे भुईपाल गावचे सूर्यकांत गावकर यांनी सांगितले की, सत्तरी तालुक्यातील दऱ्याखोऱ्यांत असलेली जैवविविधता ही भूतलावरील खरी जीवसृष्टी आहे.

त्यात पाणथळ झरे, तळी, नदी, सूक्ष्म जीव, मासे, अळंबी, कृमी, कीटक, फुलपाखरे, पशूपक्षी, फळे, भाज्या, भात शेती हे सर्व म्हणजे जैवविविधता.

गोव्यातील सर्वात उंच असणारा सत्तरी तालुक्याच्या मुकुटमणी सोसोगड असो अथवा कातळाची माळी, वाघेरी, मोर्ले गड आदी डोंगर असो, हे तेथली जैवक संपदेसाठी पोषक वातावरण निर्माण करते.

Biodiversity
Ponda Bus Stand: फोंड्यातील कदंब बसस्थानकाचे काम अद्याप रखडलेलेच, सर्व भार जुन्या बस स्टॅन्डवर

आगीच्या घटना पर्यावरणाला मारक

मागील दोन महिन्यांत सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी डोंगरांवर आग लागण्‍याचा घटना घडल्‍या. त्यामुळे जंगलातील जैवसंपत्तीचा नाश पावली आहे.

म्हादई अभयारण्यातही आगीच्‍या घटना घडल्‍या. साट्रे, देरोडे, चोर्ला, सुर्ला, चरावणे, झाडांनी आदी क्षेत्रातील वनसंपत्ती जळून खाक झाली. त्यामुळे येणाऱ्या काळात ही मौल्यवान वनसंपदा वाढविण्याची जबाबदारी वाढली आहे.

हरित जंगले ही वन्यजीवांचे माहेरघर

दुर्मीळ वनस्पती, वृक्षवेलींनी भरलेली सदाहरित जंगले आणि छोटे मोठे झरे, धबधबे हे जैवसंपदेचे अविभाज्य घटक आहेत. सदाहरित जंगले ही वन्यजीवांचे माहेरघर असून हे सर्व एक दुसऱ्यांच्या अस्तित्वावर अवलंबून असते.

मानवाकडून होणारे अतिक्रमण, जंगलांमध्ये होत असलेली बेसुमार वृक्षतोड, जाळपोळ, लोकसंख्या वाढ, खाणकाम, कारखाने यामुळे होणारे हवाप्रदूषण, मृदाप्रदूषण, रासायनिक फवारणी व त्यामुळे होणारे जलप्रदूषण शिवाय जागतिक हवामान वाढ या सर्वांचा परिणाम जैवसंपदेवर होत आहे.

या सर्वांचा विचार करून माणसाने जैवविविधता संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वनौषधींचा अभ्यास करणारे सूर्यकांत गावकर यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com