Mhaisal Dam
Mhaisal DamDainik Gomantak

Mhaisal Dam: म्हैसाळ धरणात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

पावसाला सुरवात न झाल्यास भेडसावणार टंचाई

Mhaisal Dam: गोव्यातील म्हैसाळ धरणात केवळ दोन दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पावसाला सुरूवात न झाल्यास या धरणावर अवलंबून असलेल्या गावांना पाणी टंचाई भेडसावू शकते. फोंड्यातील पंचवडी येथे हे धरण आहे.

Mhaisal Dam
Calangute Crime: कळंगुट येथे पोलिसांची मोहिम; एकाच दिवसात ताब्यात घेतले 34 दलाल

दरम्यान, पंचवडी आणि शिरोडा गावाचा काही भाग म्हैसाळ धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या धरणाची क्षमता 436.8 HaM (हेक्टर मीटर) आहे. गवळीवाडा येथे, पंचवडी टेकड्यांवर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून (WTP) दररोज सुमारे 10 दशलक्ष लिटर पाणी (MLD) काढले जाते आणि दोन्ही गावांना पुरवठा केला जातो.

25 मे रोजी म्हैसाळ धरणात फक्त 4.5 टक्के पाणीसाठा होता. तो पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आठवडाभर पुरेल, असे WRD चे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले होते.

WRD ने या जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या लोकांना ओपा वॉटर वर्क्समधून पिण्यायोग्य पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केली होती.

Mhaisal Dam
Goa Police Drone Security: गोवा पोलिसांची हायटेक सुरक्षाव्यवस्था; जी-20 बैठकीसाठी ड्रोन तैनात

राज्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले होते की, दोन दिवसांत राज्यात पाऊस न झाल्यास ओपाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागेल, असे वक्तव्य केले होते.

दरम्यान, ओपाचे पाणी शिरोड्यापर्यंत आणि गरज भासल्यास पाचवडीपर्यंत पोहोचण्यासाठी सध्याच्या शिरोडा पाईपलाईनला जोडण्यासाठी जलविभागाने गुरुवारी फोंड्यातील पाणीवाडा-बोरीम येथील जुना व्हॉल्व्ह बदलून टाकला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com