Goa Tourism: आरक्षण रद्द केले, भरपाई द्या; हॉटेलला आदेश

Goa Tourism: दीगढहून गोव्यात पर्यटक म्हणून येण्यास इच्छूक असलेल्या विनित मारवाह यांना प्रवासाच्या तीन दिवस आधी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केलेले आरक्षण रद्द केल्याचे आढळले. एका नामांकीत ॲपद्वारे त्यांनी हे आरक्षण केले होते.
The hotel reservation made online was found to be cancelled.
The hotel reservation made online was found to be cancelled.Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: चंदीगढहून गोव्यात पर्यटक म्हणून येण्यास इच्छूक असलेल्या विनित मारवाह यांना प्रवासाच्या तीन दिवस आधी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केलेले आरक्षण रद्द केल्याचे आढळले. एका नामांकीत ॲपद्वारे त्यांनी हे आरक्षण केले होते.

The hotel reservation made online was found to be cancelled.
Stray Dog: कुत्र्याच्या अंगावर ओतले गरम पाणी!

विशेष म्हणजे जागेअभावी त्यांचे आरक्षण रद्द केल्याचे त्यांना सांगण्यात आले, पण त्याच हॉटेलमध्ये चढ्या दराने खोल्या उपलब्ध असल्याचे त्याच ॲपवर त्यांना दिसत होते. यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी हॉटेलला न्यायालयीन माध्यमातून धडा शिकवला.

चंदीगढच्या जिल्हा ग्राहक मंचाकडे त्यांनी या फसवणुकीबाबत दाद मागितली. मंचाने त्यांना 75 हजारांची भरपाई आणि खटल्याचा खर्च म्हणून 7 हजार रुपये द्या, असा आदेश हॉटेल चालकांना दिला. ऑक्टोबर 2021 ची ही घटना आहे. त्यावेळी मारवाह यांनी ॲपद्वारे गोव्यातील हॉटेलची खोली आरक्षित केली होती. त्यानंतर त्यांचे आरक्षण रद्द करून त्यांना शुल्क परतावा देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com