सामूहिक प्रयत्नांमुळे राज्याचा विकास : मुख्यमंत्री

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त खास कार्यक्रम
One Year of Progressive Governance
One Year of Progressive GovernanceDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करू शकलो, असे उदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाले.

त्यानिमित्ताने माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या वतीने विधानसभेत खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार अधिक गतिमान करण्यासाठी विविध खात्यांच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य आणि तळागाळातल्या लोकांचा विकास, हा या सरकारचा केंद्रबिंदू आहे.

One Year of Progressive Governance
Goa Cyber Crime : राज्‍यात सायबर गुन्‍ह्यांचे प्रमाण वाढले

अंत्योदय पद्धतीने राज्याचा कारभार सुरू आहे. यापुढेही विकासाची प्रक्रिया अशीच सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहाय्याने सरकार डबल इंजिनचा अनुभव देत आहे.

यावेळी वर्षपूर्तीनिमित्त काढलेल्या विशेष पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सभापती रमेश तवडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, कृषी मंत्री रवी नाईक, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, इतर आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com