नाणूस ते गांजे रस्ता दुरुस्तीचा सरकारला सापडला मुहूर्त

हा रस्ता दुरुस्त करण्याकडे सरकारी यंत्रणेने साफ दुर्लक्ष केले होते
 Nanus to Ganje road
Nanus to Ganje road Dainik gomantak
Published on
Updated on

ओटा पाणी प्रकल्पपर्यंत गांजे येथील म्हादई नदीचे पाणी नेण्यासाठी गांजे ते ओपा पाणी प्रकल्पादरम्यान मोठी पाइपलाइन घालण्याचे काम गेल्या मार्च एप्रिल 2021 पासून सुरु होते. त्याचाच एक भाग म्हणून गांजे ते नाणूस चढणीपर्यंत दरम्यानचा रस्ता अर्धा अधिक खोदण्यात आला होता. या खोदलेल्या रस्त्यामुळे वाळपई-फोंडा (Ponda) मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता.

 Nanus to Ganje road
भाजपची 'या' 8 मतदारसंघात पंचाईत

रस्ता पूर्णपणे चिखलमय

गांजे ते उसगाव चढणीपर्यंत रस्ता पूर्णपणे ह्या पाण्याच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामामुळे पूर्णपणे खराब झाला होता. त्यामुळे या भागातून प्रवास करणे जिकीरीचे बनले असते. सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता नाणूस येथूनच चिखलमय बनला तो थेट गांजे येथे ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारला आहे.

हा रस्ता दुरुस्त करण्याकडे सरकारी (government) यंत्रणेने साफ दुर्लक्ष केले होते. गेल्या मे जून मध्ये करण्याचा हा रस्ता कंत्राटदाराच्या वेळकाढू धोरणामुळे तसाच राहिला. मध्ये एकदा हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले होते. परंतु, काही दिवसात ते बंद पडले या दिवसात कंत्राटदाराने एकदम कमी माणसे घेऊन या रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे आता तरी हा खराब झालेला रस्ता पूर्ण दुरुस्त होवो अशी आशा वाहनचालक करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com