मडगाव: 1961 साली गोवा मुक्त झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने गोव्याच्या विकासात आपल्या परीने भर घातली आहे. सध्याचे सावंत सरकार ही विकासात महत्त्वाची भुमिका बजावते आहे. या बरोबरच गोव्यातील संभाव्य जी-20 देशांची शिखर परिषदांमुळे नव्या संधी निर्माण होतीस असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी म्हटले आहे. ते मडगाव येथील गोवा मुक्तिदिन ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते.
(The flag hoisting ceremony at Goa Independence Day in Margao was done by Minister Nilesh Cabral)
मंत्री काब्राल म्हणाले की, जी-20 देशांची शिखर परिषद भारतात आयोजित केली जात असून असून त्यातील काही बैठका गोव्यात होणार असल्याने गोव्यासाठी पर्यटनाची आणखी कवाडे खुली होतील, यावेळी सासष्टी तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले.
मडगाव येथे गोवा मुक्तिदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री काब्राल यांनी तिरंगा ध्वज फडकावून पोलिसांची मानवंदना स्वीकारली. यावेळी आमदार आलेक्स सिक्वेरा, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, उल्हास तुयेकर, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी, पोलिस अधीक्षक गुरुदास गावडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.