घरच्यांनी नाकारल्याने वृद्ध फुटपाथवर, भिकाऱ्यांसह स्थानिकांवर भीक मागण्याची वेळ

मुलांनी हडपली मालमत्ता
The family rejected the old man; It was time for the old man to beg
The family rejected the old man; It was time for the old man to begDanik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा : आंतरराष्ट्रीय पर्यटन असलेले गोवा राज्य दरडोई उत्पन्नात देशात अग्रेसर आहे. अशी सधनता असूनही रस्त्यांवरच्या भिकाऱ्यांबरोबर फुटपाथ राहण्याची वेळ दक्षिण गोव्यातील अनेक वृद्धांवर आली आहे. सरकारने यासंदर्भात दक्षता समितीमार्फत या वृद्धांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. तसेच समाजसेवी संस्थांनीही याप्रश्‍नी पुढे यावे, अशी मागणी होत आहे. मडगाव परिसरात भिकाऱ्यांसोबत स्थानिक वृद्धही भीक मागताना दिसत आहेत. यातील काहीजणांना स्वत:च्याच मुलांनी घरातून बाहेर काढले आहे, तर काहीजणांची मुले विदेशात कामाला आहेत. त्यामुळे घरी देखभाल करणारे कोणीच नसल्याने त्यांच्यावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. (The family rejected the old man; It was time for the old man to beg)

अशाने मडगावातील फूटपाथ हाच त्यांचा आसरा बनला आहे. मडगाव परिसरातील गांधी मार्केट परिसर, पिंपळकट्टा परिसर, ओल्ड स्टेशन रोड, कामत हॉटेल, ग्रेस चर्च परिसर, नगरपालिका उद्यान तसेच इतर ठिकाणी भिकारी फूटपाथवर भीक मागताना दिसत होते. आता यात स्थानिक वृद्धांचीही भर पडत आहे. काहीजणांना वाढत्या महागाईमुळे आपले पालक डोईजड वाटत असल्याने त्यांनी तुमच्या अन्नाची व्यवस्था तुम्हीच करा, असे सुनावल्याने काही स्थानिक स्वतःहून भीक मागण्यासाठी रस्त्यावर आले आहेत, अशी धक्कादायक माहिती चौकशी केल्यावर मिळाली.

The family rejected the old man; It was time for the old man to beg
केतकी चितळेला अटक करताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

- मुलांनी हडपली मालमत्ता

मडगाव येथील उद्यानासमोर भीक मागणारा 74 वर्षीय स्थानिक ऑलन (नाव बदलले आहे) याने सांगितले की, ओडली येथे माझी बरीच स्थावर मालमत्ता होती. माझे मोठे घर होते. हे सर्व माझ्या मुलांनी हडप केले. माझी पत्नी यापूर्वीच वारली आहे. आता मला दिवसातील एक वेळचे जेवणसुद्धा देणे मुलाला शक्य होत नाही. माझा मुलगा आणि त्याची पत्नी सतत मला टोचून बोलतात. त्यामुळे मला घर सोडण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता, असे सांगितले.

मुलांना घडवले, त्यांनीच बाहेर काढले

मडगाव परिसरात भीक मागणारा किस्टोडिनो (नाव बदलले आहे) याची गोष्ट मन सुन्न करणारी आहे. हा वयोवृद्ध अंदाजे 75 वर्षांचा असेल. त्याला तीन मुलगे आणि दोन मुली. या सर्वांना पोटापाण्याला लावून त्यांची लग्नेही थाटामाटात करून दिली. यासाठी मुलांना अजिबात खर्च करावा लागला नाही. लग्न झाल्यानंतर मुले आपली काळजी घेणार असे वाटले. मात्र प्रत्यक्षात वेगळेच घडले. सर्व मुलांनी एकत्र येऊ मलाच घराबाहेर काढले, असे त्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com