गोवा वेल्हा: दरवर्षी दिवाळी सण हा हिंदू बांधवांसाठी मोठी पर्वणीच असतो. लहानथोर या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या वर्षी कोविड-19 चे संकट होते. यंदा या सावटाखाली दिवाळी साजरी होणार आहे. याकाळात अबालवृद्धांचा जल्लोष व उत्साह कायम राहणार आहे.
धनत्रयोदशीने मंगळवारी 2 नोव्हेंबरपासून सलग पाच दिवस हिंदू बांधव दिवाळी साजरी करणार आहेत. देवांचा वैद्य धन्वंतरी यांची जयंतीही याचदिवशी साजरी होणार आहे. जन्मदिन म्हणून त्यांच्या मूर्तीची पूजा केली जाते. यावेळी घराघरांत धनधान्य आलेले असते. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाचा आनंद लोकांनी लुटलेला असतो. पावसाळा जवळ जवळ संपलेला असतो. धनत्रयोदशीला शेतात पिकलेल्या भाताची कणसे घराच्या प्रवेशदाराच्या तोरणाला बांधली जातात. यास अपवाद असू शकतो. यावेळी धनत्रयोदशीचे आगळे-वेगळे स्वरूप पहायला मिळते.
दिवाळीच्या काळात खाण्याला फार महत्त्व असते. घरात तऱ्हे-तऱ्हेचा फराळ केला जातो. पोहे केले जातात. गोव्यात विपुल प्रमाणात भात पिकत असल्याने या भातापासून फराळासाठी पोहे बनवतात. या व्यतिरिक्त गोड, तिखट व अन्य खाण्याचे प्रकारही केले जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी शास्त्रानुसार दक्षिणेच्या दिशेला एक जळती पणती लावली जाते. ती पणती यमाच्या नावाने लावतो. पेटत्या पणत्त्यांची आकर्षक आरास केली जाते. दिवेलागणीला घरात, आस्थापनात धान्याची पूजा केली जाते. काही लोक सोन्याच्या नाण्यांचीही पूजा करतात. धन्वंतरी त्रयोदशी पूजा याचदिवशी साजरी होते. देवांचे वैद्य हे आयुर्वेदांचे जनक मानले जातात. यांचेही पूजन होते. हा सण साजरा करण्यामागे एक विशिष्ट हेतू असल्याचे शास्त्राकार सांगून गेले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.