राज्यातील पर्यटकात घट, हॉटेलसह टॅक्सी धंदा मंदावला

कार्निव्हलला पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात पर्यटन करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये घट झाली आहे. पणजीतील मिरामार किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यकटकांची वर्दळ मंदावली आहे. पणजी फेरी येथे देखील पर्यटक विहार करताना दिसत नाही आहेत. कोरोनाच्या तिसरी लाट सुरू असताना 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी अनेक पर्यटक राज्यात आले होते. त्यानंतर निवडणूकीच्या (Election) प्रचारादरम्यान देखील राज्यात ये-जा करणाऱ्या बड्या नेत्यांसोबतच काही पर्यटकांची वर्दळ होती. मात्र, आता पर्यटकांची वर्दळ मंदावली आहे.

पर्यटकांवर आधारीत टॅक्सी चालक, हॉटेल, आयस्क्रीम विक्रेता, शहाळे विकणारे, रेस्टॉरंट तसेच इतर व्यापारी तसेच लहान-लहान घटक यांना देखील या गोष्टीचा फटका बसत आहे. दररोजच्या खर्चापुरती देखील मिळकत होत नाही.

Goa Tourism
मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव

कार्निव्हलला पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता

येत्या 26 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत कार्निव्हलची धूम राज्यात असणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी पणजी, 27 रोजी मडगाव 28 रोजी वास्को आणि 1 मार्च रोजी म्हापसा (Mapusa) येथे कार्निव्हलचे पर्यटन खात्याद्वारे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्निव्हल महोत्सव पाहण्यासाठी देशातील विविध राज्यातील तसेच विदेश पर्यटक येतील व पुन्हा पर्यटन (Tourism) व्यवसायाला चालना प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.

Goa Tourism
निकालानंतर एमजीपी टीएमसीची सोडणार साथ?

अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य

गोव्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्याचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे अनेक पर्यटक तसेच नागरिक कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावत नाहीत. आपल्यापाशी असलेला कचरा, कचरा कुंडीत न टाकता असाच कुठेही फेकून देतात, त्यामुळे निसर्ग सौंदर्याची तर हाणी होतेच त्याचसोबत सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

पणजीतील फेरीत मांडवी नदीच्या काठावर प्लास्टीक पिशव्या, बाटल्याव इतर कचरा साचला आहे. नदीत टाकलेला हा कचरा काठावर येऊन साचतो त्यामुळे निसर्ग सौंदर्याची हाणी होते. प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन योग्य प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. साऱ्याच गोष्टींसाठी सरकारवर ताशेरे ओढणे बरोबर योग्य नव्हे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com