शिरोडा: गावाच्या सुधारणेत देशाचा विकास होतो. देशसमृध्द होतो महात्मा गांधीनी भ्रंमती करून गावाच्या समृध्दीवर भर देण्याचे आवाहन केले. शिरोडा गाव कृषीप्रधान गाव असून शैक्षणिकदृष्ट्या पुढे आलेला गाव आहे. ही प्रगती अशीच चालू ठेवून शिरोडा गाव हा राज्यातील आदर्श गाव ठरवावा असे प्रतिपादन राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी केले. ( The country becomes prosperous with the improvement of the village. - P.S. Pillai)
थळ शिरोडा येथील श्री कामाक्षी मंदिराच्या सभागृहात शिरोडा मतदारसंघात दौऱ्याच्या वेळी मतदारसंघातील चारही पंचायतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यपाल पी.एस. पिलई बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, शिरोडा सरपंच अमित शिरोडकर, बेतोडा सरपंच विशांत गावकर, पंचवाडी सरपंच अमिर नाईक, बोरी सरपंच ज्योती नाईक, ॲडीशनल सेक्रेटरी मिहिर वर्धन हे व्यासपीठावर होते.
याप्रसंगी बोलताना मंत्री शिरोडकर म्हणाले की शिरोडा गाव हा कृषीप्रधान असून या गावाने डॉ. विठ्ठलराव शिरोडकर, मेनका शिरोडकर, शोभा गुर्दु ॲड अवित शिरोडकर सारखी नररत्ने दिली. शैक्षणिकदृष्ट्या शिरोडा गावात राज्यात नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.
यावेळी सरपंच अमित शिरोडकर, विशांत गावकर यांनी गावात झालेल्या प्रगतीचा आढावा घेऊन मागण्याची निवेदने राज्यपालांना सादर केली. यावेळी चारही पंचायतीच्या वतीने सरपंचाच्या हस्ते राज्यपाल पिल्लई यांनी चांदीची गणपती मूर्ती आणि श्री कामाक्षी देवीचा फोटो देण्यात आला. अमित शिरोडकर यांनी स्वागत केले. उपसरपंच साल्वासाव फर्नांडिस, विशांत गावकर, अमिर नाईक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ अर्पून स्वागत केले. डॉ. गौरी शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्कूल ऑफ सिम्बॉयसीसच्या मुलांनी स्वागतगीत सादर केले. तर विशांत गावकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला कामाक्षी संस्थानचे अध्यक्ष राजन कामत बुडकुले, जि.प. सदस्य नारायण कामत, दीपक नाईक बोरकर, पंच शिवानंद नाईक, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक, महिला मोर्चा अध्यक्ष परिमल सामंत यांच्याबरोबर मतदारसंघातील बरेच नागरिक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.