पणजी : भाजप (BJP) आणि सभापती कार्यालयाने संगनमताने सत्तेत राहण्यासाठी बेकायदेशीर पक्षांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करून भाजपचे हे कारस्थान लवकरच गोवा खंडपीठातील सुनावणीनंतर उघड होईल, असे मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष (President of Goa Forward Party) विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी व्यक्त केले आहे.
दोन वर्षांपूर्वी घडलेल्या पक्षांतर प्रकरणाने गोव्याची प्रतिमा खराब झाली आहे. त्यावेळी भाजपला सत्तेत राहण्यासाठी 12 आमदारांनी पक्ष सोडून त्यांना पाठिंबा दिला होता. तसेच या प्रकाराला त्यांनी विलिनीकरण असे म्हटले होते. राजकीय फायद्यासाठी राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूचीची (पक्षांतरविरोधी) देखील हत्या केली आहे. गोवा फॉरवर्डने, काँग्रेसने उच्च न्यालयात दाखल केलेल्या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली.
आमदारांचे हे विलीनीकरण बेकायदेशीर आहे याची माहिती ही माहिती हक्क कायद्याखाली मिळाली आहे. भाजप आणि सभापती कार्यालयाने या पक्षांतरांना पाठिंबा दिला आहे. अशा प्रकारांमुळे विकासकामांना अडथळे निर्माण होत असल्याने अशा गोष्टी थांबवायला हव्यात, असे सरदेसाई म्हणाले.
आमची हस्तक्षेप याचिका भाजप आणि सभापती कार्यालयाचा पर्दाफाश करेल. ज्यांनी बेकायदेशीरपणे पक्षांतर केले आणि गेली दोन वर्षे सत्तेत राहिले त्यांनाही या याचिकेमुळे धडा मिळेल. भाजपने पक्षांतराला समर्थन आणि प्रोत्साहन देण्याच्या प्रक्रियेत कसा फेरफार केला हे लोकांना कळेल खंडपीठाच्या निवाड्याद्वारे कळेल. गोव्याच्या राजकारणात नव्याने प्रवेश केलेले राजकीय पक्षही पैशाच्या जोरावर पक्षांतराला प्रोत्साहन देत आहेत त्यामुळे यापुढे, असे प्रकार होऊ नयेत या हेतूनेच ही याचिका सादर केल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.