Sand Extraction: सहा लाख रुपये भरपाई द्या; ‘त्या’ होडीमालकाने खडसावताच अधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय

Sand Extraction: रेती व्यवसायासाठी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले असतानाही तुम्ही माझी होडी कापून टाकली. त्याची नुकसान भरपाई म्हणून सहा लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला मी या ठिकाणी पुढची कारवाई करू देणार नाही, असे होडीमालक गजानन तेली यांनी सांगीतले
Sand Extraction
Sand ExtractionDainik Gomantak
Published on
Updated on

Sand Extraction: रेती व्यवसायासाठी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले असतानाही तुम्ही माझी होडी कापून टाकली. त्याची नुकसान भरपाई म्हणून सहा लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला मी या ठिकाणी पुढची कारवाई करू देणार नाही, असे होडीमालक गजानन तेली यांनी आज न्हयबाग येथे होड्या कापण्यासाठी आलेल्या ‘कॅप्टन ऑफ पोर्ट’च्या अधिकाऱ्यांना सुनावल्यानंतर या अधिकाऱ्यांनी ‘आम्ही पेडण्याला जाऊन येतो’ असे सांगून काढता पाय घेतला आणि ते नंतर परतलेच नाहीत.

Sand Extraction
Goa Corona Update: कोरोना रुग्णांचे अर्धशतक; एकजण इस्पितळात दाखल

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ‘कॅप्टन ऑफ पोर्ट’चे अधिकारी विनय शिरोडकर हे अन्य सहकाऱ्यांसह पोलिस संरक्षणात न्हयबाग येथे तेरेखोल नदीकिनारी आले असता ही घटना घडली.

‘कॅप्टन ऑफ पोर्ट’चे अधिकारी गेल्यावर त्यांच्यासोबत आलेले पोलिसही नंतर निघून गेले. तरीही अधिकाऱ्यांनी ‘आम्ही पेडण्याला जाऊन येतो’, असे सांगून गेल्याने कदाचित ते परत येतील म्हणून काही रेती व्यावसायिक त्यांची तिथे वाट पाहात उभे होते; पण बराच वेळ झाल्यानंतर ते न परतल्याने रेती व्यावसायिकही घरी परतले.

बेकायदा रेती उपसाप्रकरणी ताब्यात घेतलेल्या होड्यांपैकी गजानन तेली यांच्या मालकीची होडी ‘कॅप्टन ऑफ पोर्ट’च्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्हयबाग येथे तोडली होती. अशाच प्रकारे ताब्यात घेतलेल्या अन्य होड्यांवर आज (२७ रोजी) कारवाई करणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला होता.

पण तेली यांनी माझ्या एकाच होडीवर कारवाई का केली, असा प्रश्न करत सहा लाख रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

कारवाईची टांगती तलवार कायम

मंगळवारी संध्याकाळी अधिकाऱ्यांनी गजानन तेली यांच्या मालकीची होडी मोडली होती. त्यामुळे अन्य होडीधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे अधिकारी केव्हा येऊन कारवाई करतील, याची शाश्वती नसल्याने कारवाईची टांगती तलवार आमच्या माथ्यावर आहे. या अधिकाऱ्यांनी जरी आज येऊन कारवाई केली नसली तरी आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखा हा प्रकार आहे, असे मत रेती व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.

कारवाई रोखणारा ‘तो’ नेता कोण?

बुधवारी संध्याकाळी अधिकारी पुढील कारवाई करण्यास आले असता, आमदार-मंत्र्यांना फोनाफोनी सुरू झाली. यावेळी एका नेत्याला फोन लावून अधिकाऱ्याला दिला. तेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई करत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. मात्र, त्या नेत्याने, कारवाई बंद कर. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यावर परिणाम होणार असल्याने कारवाई करू नये, असे त्याने बजावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com