'ना पगार, ना बोनस... आम्ही दिवाळी कशी साजरी करायची'

कामगार पुढचे पाऊल घेण्याच्या मनस्थितीत असताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.
 ACGL Workers
ACGL WorkersDainik Gomantak

पिसुर्ले: गेल्या साडेतीन वर्षांपासून एसीजीएल कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांचा (ACGL Workers) पगार वाढीचा करारनामा मंजूर केला नसल्याने कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या मध्ये संघर्ष निर्माण झाला आहे, त्याची प्रत्यक्ष सुरवात गेल्या महिन्याच्या दि 18 ते 22 रोजी पर्यंत कामगारांनी संप पुकारून करण्यात आली आहे, त्यावेळी कामगार पुढचे पाऊल घेण्याच्या मनस्थितीत असताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, परंतू दोन वेळा बैठका घेऊन सुद्धा काहीच निष्पन्न झाले नाही, आणि आता कंपनीने दिवाळी सणावेळी देण्यात येणारा बोनस ही दिला नाही आणि महीन्याचा पगारही दिला नसल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. याचा परिणाम येणाऱ्या काही दिवसात कामगार पुन्हा संपावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सदर कंपनीच्या व्यवस्थापनाने कंपनीच्या उत्पादनात घट निर्माण झाल्याने कंपनीला नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे कारण पुढे करून कामगारांना देण्यात येणाऱ्या काही योजना बंद केल्या आहेत, त्याच प्रमाणे कामगारांनी सन 2018 साला पासून लागू करण्यासाठी सादर केलेला पगार वाढीचा प्रस्ताव मंजूर करता अत्यंत अल्प अशी पगार देण्याची तयारी दाखवली असल्याने कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या मधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यात पाच दिवस संपावर जाऊन वेगवेगळ्या स्तरांवर कामगारांनी कंपनीच्या सतावणूकीचा पर्दाफाश केला होता. या वेळी कामगारांना बऱ्याच जणांचा वाढता पाठिंबा लाभला होता. मात्र सदर संपाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे बोलणी करून आपण योग्य तोडगा काढण्याची ग्वाही दिली होती, परंतू त्यानंतर दोन बैठका घेऊन सुद्धा काहीच निष्पन्न झाले नाही, त्यामुळे या पुढे पगार वाढीची शक्यता दिसत नाही असे कामगार संघटनेचे म्हणणे आहे.

 ACGL Workers
'विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणी दिवशीच गोमंतकीयांची खरी दिवाळी'

त्याच प्रमाणे गेल्या साडेतीन वर्षांपासून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या मध्ये समझोता घडून न आल्याने शेवटी कामगारांना संपाचे हत्यार उभारावे लागलें, त्यामुळे दोन्ही बाजूंनी काही प्रमाणात असलेली सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा संपुष्टात आली आणि आता कंपनीने दिवाळी सारख्या आंनदी उत्सवा समयी देण्यात येणारा वार्षिक बोनस व ऑक्टोबर महिन्याचा पगार वितरीत न करता कामगारांना वेठीस धरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे कामगार वर्गात पुन्हा एकदा कंपनीच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. दिवाळी हा हिंदू धर्मियांचा महत्वाचा सण म्हणून गणला जातो, त्या सणावेळी देण्यात येणारा हक्काचा बोनस आणि पगार कंपनीने दिला नाही, यावरून कंपनीला कामगारा विषयी किती आत्मियता आहे हे दिसून येत आहे, त्यामुळे आता जिंकू किंवा मरू असाच पवित्रा घेण्याची वेळ कंपनीने आणली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात कुठल्याही क्षणी कंपनीला नोटीस दिली जाईल आणि त्या संपाचा परिणाम काय होईल हे सांगता येणार नाही अशी माहिती कामगार संघटनेचे पदाधिकारी प्रशांत खानोलकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com