Ram Mandir: आक्षेपार्ह संदेशासह बाबरी मशिदीचे फोटो शेअर केल्याने म्हापशात तणाव, तिघेजण ताब्यात

म्हापसा पोलिसांनी घटनेच्या चौकशीसाठी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.
Babri Masjid
Babri MasjidDainik Gomantak
Published on
Updated on

Ram Mandir Pran Prathistha: अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी आक्षेपार्ह संदेशासह बाबरी मशिदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने म्हपशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. म्हापसा पोलिसांनी घटनेच्या चौकशीसाठी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Dude like Structure या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आक्षेपार्ह मजकूरासह बाबरी मशिदेचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. अयोध्येत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फोटो शेअर केल्याने म्हपाशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, अशाच प्ररकारची एक घटना कर्नाटकात देखील घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ताजुद्दीन दादेदार याला अटक केली आहे. तसेच, आक्षेपार्ह पोस्ट हटवली असून पुढील तपास आणि चौकशी सुरु केलीय. अटक आरोपी ताजुद्दीन दादेदार हा गदगमधील रहिवासी आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य पाहायला मिळाले. मुस्लिम समाजातील लोकांनी लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला. राम उत्सव कार्यक्रमात त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com