Bicholim Mining Issue: डिचोलीतील बैठक तापली; वेदांताची रात्रीची वाहतूक तूर्त 'होल्ड'वर

Bicholim Mining Issue: रात्रीच्यावेळी होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे संतप्त बनलेल्या पिळगावच्या लोकांनी गुरुवारी मध्यरात्री रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक बंद केली
Bicholim Mining Issue: डिचोलीतील बैठक तापली; वेदांताची रात्रीची वाहतूक तूर्त 'होल्ड'वर
Bicholim Mining IssueDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: येथील "वेदांता"च्या खाणीवरील रात्रीच्या वेळी खनिज वाहतुकीवरून निर्माण झालेला गुंता अद्याप सुटला नाही, तूर्त रात्रीची वाहतूक "होल्ड "वर ठेवण्यात आली आहे. रात्रपाळीतील खनिज वाहतूकप्रश्नी आज (शुक्रवारी) येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पिळगाव ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने या वाहतुकीसंदर्भात कोणताच अंतिम निर्णय झाला नाही.

या बैठकीत ग्रामस्थांनी खाण खात्याच्या संचालकांवर निशाणा साधताना ते सरकारच्या हातचे बाहुले बनल्याची टीका करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. रात्रीच्यावेळी होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे संतप्त बनलेल्या पिळगावच्या लोकांनी गुरुवारी मध्यरात्री रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक बंद केली होती. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी आज (शुक्रवारी) संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Bicholim Mining Issue: डिचोलीतील बैठक तापली; वेदांताची रात्रीची वाहतूक तूर्त 'होल्ड'वर
जिंदगी ना मिलेगी दोबारा का दिल चाहता है? सिद्धांत, वेदांग, इशानचे गोव्यातील फोटो पाहून तुम्हाला कोणता चित्रपट आठवतोय बघा

...तर दिवसा वेळ वाढवून द्यावी

"वेदांता" कंपनीच्या कायदा सल्लागारांनी बाजू मांडताना रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना मनस्ताप होणार नाही. त्यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. रात्रपाळीत खनिज वाहतूक नको असल्यास दिवसा वेळ वाढवून द्यावी, अशी सूचना डिचोली ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष राजाराम गावकर यांनी केली.

खाण आणि भूगर्भ खाते दोषी : रमेश गावस

या बैठकीस पर्यावरणवादी रमेश गावस उपस्थित होते. त्यांनीही रात्रीच्या वेळी होणारी खनिज वाहतूक बेकायदा आणि जनतेच्या मूलभूत हक्का विरोधात असल्याचे स्पष्ट करून या बेकायदा प्रकाराला खाण आणि भूगर्भ खात्याला दोषी धरले.

Bicholim Mining Issue: डिचोलीतील बैठक तापली; वेदांताची रात्रीची वाहतूक तूर्त 'होल्ड'वर
Mumbai Goa Highway Accident: 4 ठार, 3 जखमी; मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

रात्रीची वाहतूक बेकायदा

"वेदांता"च्या खाणीवरून सध्या रात्रपाळीत खनिज वाहतूक करण्यात येत आहे. ही वाहतूक बेकायदा चालू आहे, असा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. दिवसा होणाऱ्या खनिज वाहतुकीस आमचा विरोध नाही, मात्र रात्रीच्या वेळी खनिज वाहतूक आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका पंच मोहिनी जल्मी यांच्यासह अनिल सालेलकर, मीना सालेलकर आदी ग्रामस्थांनी मांडली.

रात्रीच्या वेळी खनिज वाहतुकीसाठी जर ट्रक पुन्हा रस्त्यावर उतरले तर आम्हीही रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक रोखून धरणार, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com