कसिनोंच्या शुल्कात दहा टक्क्यांनी वाढ

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती
Goa Casino
Goa CasinoDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील ऑपशोर आणि लॅण्ड कसिनो यांना यापूर्वी वार्षिक शुल्क आकारले जात होते. परंतु आता ते प्रतिमहिना द्यावे लागणार आहे. यामध्ये दहा टक्क्यांनी वाढ केली असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याची माहिती देखील यावेळी सावंत यांनी दिली आहे.

Goa Casino
पिसुर्लेच्या खनिज वाहतुकीवर बंदी कायम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील कॅसिनोच्या कामकाजाचे नियमन करण्यासाठी नवीन नियम अधिसूचित करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

त्यांच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात, सावंत म्हणाले की, कॅसिनोच्या कामकाजाला सुव्यवस्थित आणि नियमन करण्यासाठी गोवा, दमण आणि दीव सार्वजनिक जुगार कायदा, 1976 अंतर्गत नवीन नियम लागू केले जातील. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना त्यांनी सविस्तर काहीही बोलण्यास नकार दिला. "आम्ही त्यावर काम करत आहोत आणि तुम्हाला कळेल," असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com