Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांमुळे मंदिरांचे रक्षण

Chhatrapati Shivaji Maharaj: मदगे : ‘शिवप्रेरणा’तर्फे राज्यस्तरीय चर्चासत्रात मार्गदर्शन
chhatrapati shivaji maharaj Statue At Calangute
chhatrapati shivaji maharaj Statue At CalanguteDainik Gomantak

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त महाराष्ट्र हा गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. कारण गोवा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत छत्रपतींनी आपले राज्य पसरवले होते. गोव्यातील नव्या काबिजादीतील देवळे शिवाजी महाराजांमुळेच आजपर्यंत उभी आहेत. अर्धा अधिक गोवा मराठ्यांच्या अमलाखाली होता, असे इतिहास अभ्यासक सचिन मदगे यांनी नमूद केले.

chhatrapati shivaji maharaj Statue At Calangute
Goa Politics: प्रलोभनांना बळी पडू नका; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी गोवा शाखा व गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळ आयोजित ‘शिवप्रेरणा’या राज्यस्तरीय चर्चासत्रात शिवाजी महाराज, संभाजी महाराज व गोवा या विषयावर ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने हिंदुधर्म, आध्यात्मिकता, अस्मिता पुनरुज्जीवित केली असा सूर निघाला. 350 व्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यानिमित्त या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्राचे उद्‍घाटन मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांच्या हस्ते व चर्चासत्राचे वक्ते लेखक व संशोधक प्रशांत पोळ, रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, अभय जगताप, सचिन मदगे व विवेकानंद केंद्राचे संयोजक वल्लभ केळकर यांच्या उपस्थितीत झाले.

chhatrapati shivaji maharaj Statue At Calangute
Goa Politics: दक्षिण गोव्यात 6,22,391 मतदार

जगताप शककर्ते शिवाजी महाराज या विषयावर म्हणाले, भारतातील मठ मंदिरे, गाय आणि माता यांचे अधःपतन करण्यात परकीय शक्ती वावरल्या. हे सर्व परत मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले.

‘शिवाजी महाराजांचे प्रशासन’ याविषयावर पोळ म्हणाले, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या भक्कम प्रशासनामुळेच मुघल सैन्याला आणि मुघल बादशहांना ‘सळो की पळो’ केले.

सूत्रसंचालन पूजा बर्वे यांनी केले. डॉ. सागर माळी, तेजा परब गावकर, प्रीती वेळीप, अमेय किंजवडेकर, स्नेहा जांबोटकर व रुपाली डोईफोडे यांनी परिचय करून दिला. प्रेक्षा जोशी हिने प्रार्थना सादर केली.

औरंगजेबाचे थडगे!

औरंगजेब या शिवशाहीला नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशाने आला होता, मात्र १७०७ साली त्याचेच थडगे महाराष्ट्रात बांधले गेले. ‘शिवराज्यभिषेकाचे दुरगामी परिणाम या विषयावर थोरात म्हणाले.

महाराजांनी शेतीत सुधारणा करून आपल्या रयतेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी दिल्ली जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. अवघ्या बत्तीस वर्षांत अनेक लढाया लढल्या व शिताफीने जिंकल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com