Tele MANAS : मनोरुग्णांचा आधार ' टेली मानस हेल्पलाईन'; ६ हजारांहून अधिक रुग्णांनी घेतला उपक्रमाचा लाभ

Tele MANAS : वर्षभरात सहा हजारांहून अधिक रुग्णांनी घेतला उपक्रमाचा लाभ
Tele MANAS
Tele MANAS Dainik Gomantak
Published on
Updated on

Tele MANAS :

सासष्टी, राज्यात मानसिक रुग्णांमध्ये वाढ होत चालली असून अशा रुग्णांना सल्ला व सूचना तसेच उपचारांची दिशा दाखविण्यासाठी एक वर्षापूर्वी टेली मानस हेल्पलाईन सुरू केली होती. वर्षभरात सहा हजारांहून अधिक रुग्णांनी या हेल्पलाईनचा आधार घेतला. या उपक्रमाचा सर्वत्र प्रसार होणे आवश्यक आहे, असे टेली मानसच्या दक्षिण गोव्यातील प्रमुख डॉ. स्नेहा पोकळे यांनी सांगितले.

आमच्याकडे मानसिक आजार जडलेले २० ते ४० वयोगटातील रुग्ण मदतीसाठी संपर्क साधतात. यामध्ये भ्रमात राहणे, नैराश्य, चिंता, तणाव, व्यसनाधीनता, कामाच्या ठिकाणी तणाव, तसेच आत्महत्या करण्याचा विचार करणाऱ्यांचा समावेश असतो.

जर रुग्णाला जास्त गंभीर असेल किंवा त्याला औषधोपचाराची गरज असेल, तर त्याला बांबोळी येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्रीक ॲण्ड ह्युमन बिहेवियर’मध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला जातो. मानसिक रुग्णांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाते. या मोफत सेवेचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पोकळे यांनी केले आहे.

या उपक्रमामुळे अनेक कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून रुग्णांवर नियमित उपचार सुरू आहेत, असे सांगण्यात आले.

२४ तास अखंडित सेवा :

दक्षिण गोव्यातील टेली मानसचे हेल्पलाईन केंद्र दक्षिण जिल्हा इस्पितळात स्थापले असून ही हेल्पलाईन वर्षभर २४ तास सेवा देते. या केंद्रात १० सल्लागार आहेत. शिवाय मानस शास्त्रज्ञ, प्रोजेक्ट संयोजक, डाटा ऑपरेटर, परिचारिका असा कर्मचारी वर्ग आहे.

टेली मानस हेल्पलाईनची सुरवात ऑक्टोबर २०२२ साली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केली. गोव्यात ही सेवा आरोग्य संचालनालयाच्या अधिपत्याखाली सुरू असल्याची माहिती डॉ. पोकळे यांनी दिली.

Tele MANAS
Margao Goa: अवैधपणे मतमोजणी केंद्रात प्रवेश, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्र्यांच्या अटकेची मागणी

उपक्रमाची वैशिष्ट्ये

एकदा संपर्क केलेल्या रुग्णाची हेल्पलाईनवरून वारंवार विचारपूस, तसेच उपचारांसंदर्भात पाठपुरावा केला जातो.

मानसिक आजार हा मेंदूच्या समस्येशी निगडित असतो. अशा रुग्णांना किंवा नातेवाईकांना सल्ला, सहकार्य केले जाते.

मानसिक रोग तसेच हेल्पलाईनच्या जनजागृतीसाठी शिबिरे, कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित केली जातात.

शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन या उपक्रमाविषयी माहिती देण्यात येते.

टेली मानस हेल्पलाईनचा संपर्क नंबर १४४१६ असून तो २४ तास उपलब्ध असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com