Kidney Problem: तुयेतील तेजलला मदतीची आस

Kidney Problem: किडनीच्या आजाराने त्रस्त : प्रत्यारोपणाची नितांत गरज
Pednrkar Family
Pednrkar FamilyDainik Gomantak
Published on
Updated on

Kidney Problem: पेडणे तालुक्यात मांद्रे मतदारसंघात तुये पंचायत क्षेत्रातील सोणये-पालये येथील पेडणेकर कुटुंबातील तेजल मनोहर पेडणेकर (३०) ही युवती मूत्रपिंड अर्थात किडनी निकामी होण्याच्या आजाराने ग्रस्त आहे. तेजल पेडणेकरचा जीव वाचवण्यासाठी पेडणेकर कुटुंबाची धडपड सुरू आहे.

Pednrkar Family
Goa Accident News: राज्यात अपघातांची मालिका सुरूच बस-टुरिस्ट टॅक्सीची समोरासमोर टक्कर

डॉक्टरांनी केलेल्या निदानानुसार हा आजार ‘सीकेडी स्टेज-५’वर पोहचला आहे. सध्या तिच्यावर हेमो डायलेसीसचा उपचार सुरू आहे. तिचे स्वास्थ्य स्थीर ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान तीनवेळा हेमो डायलेसीसची गरज पडत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तत्काळ किडनी प्रत्यारोपणाची शिफारस करण्यात आली आहे.

या शस्त्रक्रियेसाठी आणि तत्संबंधी औषधोपचारासाठी किमान १५ लाख रुपयांची गरज भासणार आहे. वरिष्ठ सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. शीतल लिंगडे या तेजलवर उपचार करत आहेत.

तेजलची आई देणार किडनी

सोणये-पालये येथील पेडणेकर हे एक गरीब शेतकरी कुटुंब आहे. तेजलच्या किडनी प्रत्यारोपणासाठी मात्र मोठा खर्च येणार असल्याने तो कसा उभारणार या चिंतेने हे कुटुंब त्रस्त आहे. तेजलची आई गुणवंती यांनी आपल्या मुलीला किडनी देण्याची तयारी दर्शवली आहे.

येथे करू शकता मदत...

तेजल मनोहर पेडणेकर

बँक : बँक ऑफ इंडिया

शाखा : साळगाव

खाते क्रमांक : १०१०१०११०००७२०४

आयएफएससी कोड : बीकेआयडी०००१०१०

मोबाईल संपर्क क्रमांक- ९८२३८९०५०५

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com