Panaji News : तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्यांसाठी व्हावा..! कुलगुरू हरिलाल मेनन

Panaji News : ‘आयकॉन २०२३’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ
Panaji
Panaji Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News : पणजी, कोणतेही तंत्रज्ञान कपाटात बंदिस्त करून ठेवणे भारतासारख्या देशाला परवडणारे नाही, हे तंत्रज्ञान तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य माणसांच्या भल्यासाठी आणि सामाजिक विकासासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन यांनी केले.

ते नैसर्गिक भाषा प्रक्रिया या विषयावर आयोजित केलेल्या आयकॉन २०२३ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी गोवा विद्यापीठातील रसायनशास्त्र सभागृहात बोलत होते.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, प्रो. पुष्पक भट्टाचार्य, प्रो. शिवाजी बंडोपाध्याय, प्रो. शोभा एल, गोवा बिझनेस स्कूलच्या डीन ज्योती पवार, प्रो. रामराव वाघ आदी मान्यवरउपस्थित होते.

परिषदेची सुरुवात सरस्वती वंदनेने आणि दीप प्रज्वलनाने झाली. डीन ज्योती पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आयकॉन २०२३ या परिषदेसाठी आलेल्या संशोधनात्मक लेखांच्या गोषवारा पुस्तिकेचे अनावरण झाले.

यावेळी डॉ. पुष्पक भट्टाचार्य, प्रो. शिवाजी बंडोपाध्याय, शोभा एल. यांची मनोगते झाली. सूत्रसंचालन पूर्वा नाईक यांनी केले.प्रो. रामराव वाघ यांनी आभार मानले. ही परिषद दि. १७ डिसेंबरपर्यंत असणार आहे.

आठ देशांतील मान्यवर तज्ज्ञांचा समावेश

उच्च शिक्षण संचालनालय, पर्वरी आणि गोवा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या परिषदेत भारत, नेपाळ, बांगलादेश, यूएसके, युके, जर्मनी, इटली, मॅक्सिको आदी देशांतील मान्यवर तज्ज्ञांचा समावेश आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रो. कविता असनानी यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय परिषदेतील ठळक बाबी

या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी १७४ संशोधनात्मक लेख प्राप्त. त्यापैकी ९३ संशोधनात्मक लेखांचा समावेश.

३० संशोधनात्मक लेखांची सादरीकरणासाठी निवड.

इंडो युरोपियन, इंडो आर्यन, द्रविडी, तिबेटी बर्मन या भाषाकुलातील भाषांचा समावेश.

कुलगुरू हरिलाल मेनन म्हणाले...

१. भारताची लोकसंख्या १.४ अब्ज इतकी आहे. बहुतांशी लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे‌.

२. २०१० या वर्षाला मी चौथ्या औद्योगिक क्रांतीचे वर्ष मानतो. या वर्षांपासूनच एआय, रोबोटिक्स आणि ड्रोन या संकल्पना अस्तित्वात आल्या.

३. समाजशास्त्रज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ यांनी एकत्र येऊन सामाजिक विकासात हातभार लावायला हवा.

४. तंत्रज्ञानातून होणारी प्रगती आणि निर्माण होणारे धोके यांच्यातून समन्वयाचा मार्ग काढला पाहिजे.

Panaji
Goa Police: 7 पोलिस अधिकाऱ्यांना मुख्‍यमंत्री सुवर्ण पदके

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com