Goa:राष्ट्रीय ज्युनियर, सबज्युनियर स्पर्धेसाठी संघ जाहीर

टेनिस क्रिकेटमध्ये (Tennis cricket)गोव्याचा सहभाग.स्पर्धेसाठी रवाना होण्याआधी सर्व खेळाडूंची कोविड-१९ (Covid-19)नुसार आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल.
गोव्याच्या ज्युनियर आणि सबज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट संघासमवेत मान्यवर
गोव्याच्या ज्युनियर आणि सबज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट संघासमवेत मान्यवर Dainik gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर प्रदेशमधील आगरा (Agra)येथे होणाऱ्या मुला-मुलींच्या सबज्युनियर आणि ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे संघाचा समावेश आहे. ही स्पर्धा गुरुवार दि 23 सप्टेंबर पासून सुरु होईल.

सबज्युनियर गट 16 वर्षांखालील खेळाडूंचा, तर ज्युनियर गट 19 वर्षांखालील खेळाडूंचा आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार राष्ट्रीय स्पर्धा जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)होणार होती, पण तेथील कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे भारतीय टेनिस बॉल क्रिकेट महासंघाने स्पर्धा आगरा येथे घेण्याचे ठरविले आहे.अशी माहिती गोवा टेनिस क्रिकेट संघटनेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

गोव्याच्या ज्युनियर आणि सबज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट संघासमवेत मान्यवर
गोव्याचा रणजी क्रिकेटपटू रीगनच्या हाती पुन्हा टेबल टेनिस रॅकेट

गोव्याच्या सर्व संघांना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Pandit Jawaharlal Nehru Stadium)गोवा क्रीडा(Sport) प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, खजिनदार अश्रफ पंडियाल, सहाय्यक संचालक महेश रिवणकर, गोवा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव रूपेश नाईक, तसेच प्रशिक्षक नीलेश नाईक, हरेश पार्सेकर, हेमंत खोत, अजिंक्य नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी रवाना होण्याआधी सर्व खेळाडूंची कोविड-१९ नुसार आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल.

गोव्याचे संघ(Goa Team) :

सबज्युनियर गट मुले: वैष्णव नाईक, साईश नाईक, अक्षद नाईक, स्वयम फडते, कन्हैया गावडे, हर्ष गाला, साहिल पारोडकर, प्रथमेश देसाई, शौनक नाईक, आर्यन पालकर, दीप शेट्ये, ओम गावडे, शुभांकर देसाई, युवराज बोरकर.

मुली: कृत्तिका महाले, नेत्रा लमाणी, सिंतिया नाईक, मयेशा पालयेकर, कोमल हल्लुरा, तन्वी गावडे, रिया मालवणकर, पावल हळगळी, आर्या आजगावकर, प्राची नाईक, संतोषी तुयेकर, सनिका धुरी, संतोषी सिनारी, ईशा नाईक.

ज्युनियर गट मुले: संकल्प नाईक, पुनीत खांडेपारकर, कुतबुद्दीन जमादार, विजय हळगेकर, राहिल तळगावकर, नमेश काणकोणकर, गौरांग पिकुळकर, पूर्णय सुधीर, अभिषेक गावकर, प्रतीक नाईक, तन्मय पागी, वल्लभ नाईक, साईश गावडे, समरण गावडे.

मुली: मोनिका नाईक, अंकिता जल्मी, ईशा नाईक, अंकिता गुप्ता, रिया फोलकर, सोनल सिंग, पूजा बिसकर्मा, कनक्षा गावडे, साक्षी नाईक, मीनाक्षी हळगिरी, के. दीक्षा, अमिशा शेटगावकर, पूजा गुप्ता, संतोषी तुयेकर. यांचा गोव्याच्या संघात समावेश असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com