Shiroda School Dispute: ...अखेर शिरोड्यातील ‘त्या’ शिक्षिकेची बदली! विद्यार्थी आणि पालकांची मागणी मान्य

Teacher Vandana Patil Transferred: शिरोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि पालकांनी बहिष्कार घातल्यानंतर वादग्रस्त शिक्षिका वंदना पाटील यांची बदली करण्यात आली.
Teacher Vandana Patil
Teacher Vandana Patil Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: तारीवाडा-शिरोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि पालकांनी बहिष्कार घातल्यानंतर वादग्रस्त शिक्षिका वंदना पाटील यांची अखेर तोर्ल-शिरोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात बदली करण्यात आली.

तारीवाडा-शिरोडा येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी (Student) आणि पालकांनी शिक्षिका वंदना पाटील यांच्या बदलीच्या मागणीसाठी आज शाळेवर बहिष्कार घातला होता. या शिक्षिकेची बदली होईपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली होती.

Teacher Vandana Patil
Shiroda School Dispute: "आमकां वंदना टीचर नाका!" म्हणत शिरोड्यातील सरकारी शाळेवर विद्यार्थ्यांचा बहिष्कार

विद्यार्थ्यांबरोबर पालकसुद्धा मोठ्या संख्येने विद्यालयाबाहेर थांबले होते. यावेळी पालक लक्ष्मण तारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तारीवाडा-शिरोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात ३-४ महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षिकेविरोधात पालकांनी तक्रार नोंदविली होती. यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्थानिक आमदार तथा जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, पान १० वर

आपली मुले समजून शिकविते; पण..

मी येथील विद्यार्थ्यांना आपलीच मुले आहेत, असे समजून शिकवत होते; परंतु विद्यार्थ्यांचे पालक शाळेत येऊन मला मानसिक त्रास देत होते. यासंदर्भात मी शिक्षण खात्याकडे पत्रव्यवहार करून तक्रार दिली होती. पालकांनीही माझ्याविरुद्ध संबंधित खात्याकडे तक्रार दिली असल्याने येथे शिक्षण खात्याने शाळेत तपासणी केली, असे वंदना पाटील यांनी सांगितले.

Teacher Vandana Patil
Shivnath Temple, Shiroda: शिरोड्यातलं प्रसिद्ध 'शिवनाथ मंदिर'; कलात्मकतेचा प्राचीन ठेवा

शिक्षिकेविषयी चांगले मत, तरीही आंदोलन

शिक्षण खात्याचे साहाय्यक संचालक डॉ. उदय गावकर यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना पाठवून शाळेत तपासणी केली. मुलांना या शिक्षिकेविषयी विचारले, तेव्हा सर्वांनी शिक्षिकेविषयी चांगले मत व्यक्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com