विश्वजीत राणे यांची राजनाथ सिंह यांच्याशी भेट, INS हंस जवळील 'बफर झोन'बाबत काय झाली चर्चा?

वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी याबाबत नुकतेच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला होता.
Vishwajit Rane Meets Rajnath Singh
Vishwajit Rane Meets Rajnath Singh

Vishwajit Rane Meets Rajnath Singh Over Vasco Buffer Zone: वास्को येथील आयएनएस हंसच्या आसपास असलेल्या 'बफर झोन'मुळे स्थानिक लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

गोव्याचे शहर आणि नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी (दि.23) केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी राणे आणि सिंह यांच्यात 'बफर झोन'बाबत चर्चा झाली.

वास्को येथील आयएनएस हंस नौदल तळाच्या आजूबाजूच्या लष्करी बांधकामाभोवती 500 मीटरचा 'बफर झोन' चिन्हांकित केला आहे. 'बफर झोन'मध्ये राहणाऱ्या अनेक रहिवाशांना नवीन बांधकाम कामासाठी भारतीय नौदलाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळविण्यात अडचणी येत असल्याची, तक्रार स्थानिकांनी केली आहे.

वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी याबाबत नुकतेच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. केंद्र सरकार आणि लष्करासोबत बोलून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली होती.

बफर झोनमुळे स्थानिकांना बांधकाम वाढवायचे झाल्यास अथाव इतर बांधकाम करायेच असल्यास संरक्षक खात्याच्या ना हरकत प्रमाणपत्र लवकर मिळत नाही. त्यामुळे नागरिक त्रासले असल्याचे आमदार साळकर यांनी म्हटले होते.

दरम्यान, मंत्री विश्वजीत राणे यांनी याबाबत दिल्लीत शनिवारी संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. 'बफर झोन'बाबत राजनाथ सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. असे राणे यांनी म्हटले आहे.

वास्को येथील INS हंसाच्या आवारात दाबोळी विमानतळ आहे. नौदल आणि नागरी उड्डाणांसाठी या विमानतळाचा वापर केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com