‘ओला - उबर’ सेवेपेक्षा टॅक्सी महामंडळ स्थापन करा

व्हेंझी व्हिएगस: टॅक्सीचालकांना रोजगार मिळवून द्या
Mavin Gudinho
Mavin GudinhoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात ‘ओला - उबर’ सेवा आणण्याऐवजी गोवा सरकारने गोव्यात टॅक्सीसेवा महामंडळ स्थापन करून गोमंतकीय टॅक्सीचालकांना रोजगार मिळवून द्यावा, अशी मागणी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी गोव्यात ‘ओला - उबर’ सेवा सुरू करणार असे संकेत दिल्यावर आज बाणावली येथे टॅक्सीचालकांनी बैठक घेतली.

(Taxi Driver demanding Establish a taxi corporation rather than a ola Uber service)

Mavin Gudinho
राज्यात कोरोना संक्रमण दर 14.30 टक्क्यांवर, नवे 130 बाधित रुग्ण

‘ओला - उबर’ सेवा सुरू केल्यास गोवेकर टॅक्सीचालक वाऱ्यावर बेरोजगार होतील. त्यांचे हितरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असून हे महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत याची भेट घेणार आहे. गोव्यात टॅक्सी व्यवसाय चालला पाहिजे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचीही आपण भेट घेऊ, असे त्यांनी सांगितले. अखिल गोवा टॅक्सीमालक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी यावेळी गोव्यातील टॅक्सीचालक मीटरचा वापर करत नाहीत हा आरोप चुकीचा असून सर्व टॅक्सींमालकांनी मीटर बसविली आहेत. मात्र, पर्यटक स्वतःच मीटर नको असे सांगत असतील, तर आम्ही काय करायचे असा सवाल त्यांनी केला.

Mavin Gudinho
जमिनी हडप करण्याची 92 प्रकरणे उघडकीस

राज्यात ‘ओला - उबर’ या ॲपसह चालणाऱ्या टॅक्सीसेवा राज्यात सुरू करण्यावाचून काही पर्याय नाही, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे. गुदिन्हो यांचे म्हणणे म्हणजे आपण सांगेल तो प्रकार आहे. राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या विविध वाहन सेवा आहेत. या सर्व सुविधा देणाऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन त्यावर तोडगा काढला पाहिजे. सरकारने टॅक्सीवाल्यांसाठी महामंडळ स्थापन करावे. चर्चेनेच प्रश्‍न सुटणार आहे याकडे सरकारने लक्ष पुरवावे.

- व्हेंझी व्हिएगस, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com