तरुण तेजपालची डोकेदुखी वाढली...

सुनावणीस परवानगी: आव्हान देण्याइतपत पुरावे उपलब्ध
Tarun Tejpal Case
Tarun Tejpal CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सहकारी तरुणीवरील बलात्कार प्रकरणातून तरुण तेजपाल याला म्हापसा न्यायालयाने निर्दोष ठरविलेल्या निवाड्याला आव्हान दिलेली सरकारची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दाखल करून घेतली. या आव्हान याचिकेवर सुनावणी घेऊ नये, यासाठी तेजपालने केलेला अर्ज फेटाळला आहे. या निवाड्याला आव्हान देण्याइतपत सबळ प्राथमिक पुरावे उपलब्ध असल्याने सुनावणी घेण्यास गोवा खंडपीठाने परवानगी दिली आहे.

Tarun Tejpal Case
'गोव्यात मोफत गॅस सिलिंडर योजना जूनपासून'

पासपोर्ट नूतनीकरणास मुभा

2013 पासून तरुण तेजपाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून त्याचा पासपोर्ट न्यायालयात आहे. 2018 साली त्याच्या पासपोर्टची मुदत संपल्याने त्याच्या नुतनीकरणासाठी अर्ज केला होता. गोवा खंडपीठाने त्याला पासपोर्ट नुतनीकरणासाठी तूर्त तो देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, नूतनीकरणानंतर पासपोर्ट मिळवण्यासाठी त्याला पुन्हा गोवा खंडपीठाकडे अर्ज करावा लागणार आहे.

इन कॅमेरा सुनावणी; निवाडा नाही

सरकारने तेजपालच्या निर्दोषत्वाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याला तेजपालने विरोध केला आणि सुनावणी इन कॅमेरा घ्यावी, असे दोन अर्ज केले होते. त्यापैकी इन कॅमेरा सुनावणी घेण्याचा अर्ज यापूर्वीच उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे तेजपालने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, त्यावरील सुनावणी अजून झालेली नाही. अखेर उच्च न्यायालयाने आव्हान याचिकेला विरोध केलेल्या अर्जावर सुनावणी घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com