Tarun Tejpal Case: हायकोर्टच्या आदेशाला तेजपालचे आव्हान, शिक्षा व दोषसिद्धी अमान्य; लढा आता सर्वोच्च न्यायालयात

Tarun Tejpal Supreme Court case: तहलका’ नियतकालिकाचा माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल याच्याविरुद्धच्या २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडून याचिका दाखल झाल्याने कायदेशीर संघर्ष तीव्र झाला आहे.
Tarun Tejpal Supreme Court case
Tarun Tejpal CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘तहलका’ नियतकालिकाचा माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल याच्याविरुद्धच्या २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडून याचिका दाखल झाल्याने कायदेशीर संघर्ष तीव्र झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ६ ऑगस्ट रोजी सुनावलेल्या १० वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला तरुण तेजपालने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. गोवा खंडपीठाने त्याला सुनावलेली १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दिलेला दोषसिद्धीचा निर्णय रद्द करा, अशी मागणी त्याने केली आहे.

Tarun Tejpal Supreme Court case
Goa Rent A Cab: 'रेन्ट-अ-कॅब'च्या मनमानीला लगाम; गोव्यात आता परवाने अन् वाहन तपासणीसाठी समान नियम

दुसरीकडे, गोवा सरकारने १८ ऑगस्ट रोजी याचिका दाखल करून तेजपालच्या शिक्षेत वाढ करून जन्मठेपेची मागणी केली आहे. गोवा सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये तेजपालची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने तो निकाल रद्द केला आहे.

Tarun Tejpal Supreme Court case
Goa Cricket: गोव्याचा यष्टिरक्षकाचा प्रश्न सुटणार? शिवेंद्र भुजबळच्या फलंदाजीने दिला मोठा दिलासा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com