डिचोली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी डिचोली मतदारसंघातील डिचोली शहर, साळ, नानोडा, कासारपाल या भागांतील प्रमुख कार्यकर्त्यांची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही भाजपच्या (BJP) भक्कमपणे पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली. तसेच उरलेल्या दिवसांत पक्षाच्या विजयासाठी रात्रंदिवस काम एक करू, असे स्पष्ट आश्वासन दिले.
या दौऱ्यात तानावडे यांनी आयडीसीमधील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवदास नायर यांची भेट घेतली. श्याम मातोंडकर हेही यावेळी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र सावईकर यांच्याशी संवाद साधला. डिचोली शहरातील वासुदेवनगरात त्यांनी घरोघरी भेट देऊन भाजपचा प्रचार केला. यावेळी पक्षाचे उमेदवार राजेश पाटणेकर, शीतल मातोंडकर, अमिता नाईक, हर्षाली कळंगुटकर, शालन कुंभार आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
नानोडा परिसरातील पिस्तेवाडा येथील नारायण फडके, तुळशीदास गावकर, बाबालो तुळसकर, वासुदेव तुळसकर, समीर फळारी या कार्यकर्त्यांशी तानावडे यांनी संवाद साधला. नंतर भटवाडी येथे अनिल पाडेलकर, तुकाराम पेडणेकर, विजय भिस्कुटे, दयानंद भिस्कुटे यांची तर कासारपाल येथे शांताराम मोर्लेकर यांची भेट घेऊन निवडणूक आणि प्रचारकार्य याबाबत तानावडे यांनी बातचित केली.
नाराज कार्यकर्त्यांची काढली समजूत
भाजपचे काही कार्यकर्ते काही कारणास्तव नाराज बनले होते. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढली आणि पक्षासाठी काम करण्याचे त्यांना आवाहन केले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे पक्ष दुर्लक्ष करणार नाही. प्रत्येकाचा मान आणि सन्मान राखला जाईल, असे आश्वासन त्यांनी या कार्यकर्त्यांना दिले. दरम्यान, तानावडे यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच प्रदेशाध्यक्ष आपल्या भेटीला आल्याचे पाहून कार्यकर्त्यांमध्ये समाधान आणि उत्साह दिसून आला.
साळ, नानोड्यातील कार्यकर्त्यांशी संवाद
त्यानंतर साळ येथील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संदीप राऊत यांच्याशी तानावडे यांनी पक्षाच्या प्रचारविषयी चर्चा केली. तसेच सायंकाळी उशिरा नानोडा गावातील कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी धानो गावकर, बाबलो गावकर, बूथ अध्यक्ष सचिन गावकर उपस्थित होते. त्यानंतर तानावडे यांनी तेथील श्रीराम मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन केळकर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.